ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारने रब्बी विपणन हंगाम 2026-27 दरम्यान पंजाबमधील गव्हाची खरेदी, उचल आणि वाहतूक याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली

Posted On: 07 MAY 2026 10:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मे 2026

 

'मंडयांमधील अतिरिक्त साठ्यासारख्या (glut-like) परिस्थितीसाठी मंत्र्यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले' या मथळ्याखाली 07.05.2026 रोजी द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमी संदर्भात, सरकारने पुढील वस्तुस्थिती मांडून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

1. गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाची आवक कमी

पंजाबमध्ये 06.05.2026 पर्यंत गव्हाची एकूण आवक सुमारे 122 लाख मेट्रिक  इतकी नोंदवली गेली. 2025 मध्ये याच कालावधीत ती 125 लाख मेट्रिक टन इतकी होती. अशा प्रकारे, चालू रब्बी विपणन हंगामातील आवक ही गेल्या वर्षाच्या तुलनेत 3 लाख मेट्रिक टनने कमी आहे.

2. गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक प्रगतीशील उचल

06.05.2026 पर्यंत मंडयांमधून गव्हाची उचल 78.96 एलएमटी इतकी, मागील वर्षाच्या याच कालावधीतील 75.63 एलएमटी गहू खरेदीच्या तुलनेत ती लक्षणीयरित्या जास्त आहे. आवक कमी असूनही, मालाची उचल आणि वाहतूक जास्त झाली. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू हंगामात मंडयांमधून गव्हाची वाहतूक अधिक चांगली झाली, त्यामुळे गव्हाचा अतिरिक्त साठा कमी झाला.

3. थेट वितरण नियोजनात सुधारणा

चालू हंगामात मंड्यांमधून थेट वितरणाच्या कामकाजाचे व्यापक नियोजन करण्यात आले. एप्रिल 2026 मध्ये, थेट वितरण यंत्रणेद्वारे अंदाजे 3.5 लाख मेट्रिक टन गव्हाची वाहतूक झाली. याशिवाय, मे 2026 मध्ये सुमारे 6.6 लाख मेट्रिक टन गव्हाच्या  थेट वितरणाची योजना आधीच आखण्यात आली असून, जून 2026 मध्ये अतिरिक्त 8 लाख मेट्रिक टन गव्हाचे वितरण अपेक्षित आहे. या अनुषंगाने, राज्य शासनाच्या विनंतीनुसार, चालू रबी विपणन हंगामात, बाजारपेठामधून एकंदर सुमारे 18 लाख मेट्रिक टन गव्हाच्या  थेट वितरणाचं नियोजन करण्यात आलं आहे.  बाजारपेठांतून माल लवकर उचलला जात असल्याचं आणि गर्दी कमी करण्यासाठी सातत्याने आणि समन्वित प्रयत्न केले जात आहेत, हेच यातून  दिसून येते.

4. पंजाबला सर्वाधिक 'गहू विशेष' गाड्या

एप्रिल 2026 मध्ये, देशभरात गहू वितरित करण्यासाठी धावणाऱ्या 413 गाड्यांपैकी 234 विशेष गाड्या पंजाबसाठी देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, मे 2026 महिन्यात, एकंदर उपलब्ध असलेल्या 354 'गहू विशेष' गाड्यांपैकी, 201 'गहू विशेष' गाड्या, पंजाबसाठी निर्धारित करण्यात आल्या. अर्थात, देशभरात नियोजित करण्यात आलेल्या एकंदर गव्हाच्या वाहतुकीच्या 60% वाटा पंजाबला देण्यात आला. 2025-26 साली पंजाबमधून झालेली गव्हाची सरासरी आवक ही देशाच्या वाहतुकीच्या 60% आहे, आणि या वर्षी देखील याच प्रमाणात वाहतूक सुरु राहील. याव्यतिरिक्त, मंत्रालय आणि भारतीय अन्न महामंडळ, पंजाबमधील प्रत्यक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसंच, बाजारपेठांमध्ये गव्हाचा अतिरिक्त साठा कमी करण्याच्या उद्देशाने, मे 2026 मध्ये, उत्तर प्रदेश आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये गहू पाठवण्यासाठी पंजाबला 100 अतिरिक्त विशेष गाड्या (ज्यातून सुमारे 3 लाख मेट्रिक टन गव्हाची वाहतूक करता येईल) देण्यात आल्या आहेत.

 

* * *

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/सविता म्‍हस्‍कर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2258914) अभ्यागत कक्ष : 12