अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त, भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे, स्थलांतरित कामगारांसाठी आर्थिक साक्षरता शिबिराचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 04 MAY 2026 3:00PM by PIB Mumbai

पणजी, 4 मे 2026

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या औचीत्त्याने, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या, आर्थिक समावेशन विकास विभाग, पणजी, मार्फत, पट्टो येथे, 30 एप्रिल 2026 रोजी, स्थलांतरित कामगारांसाठी आर्थिक साक्षरता जागरुकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आर्थिक समावेशन आणि सुरक्षित बँकिंग व्यवहारांना चालना देणे हे या शिबिराचे उद्दिष्ट होते. रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक संचालक प्रभाकर झा यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

या शिबिरात सुमारे 80 सहभागींना बचतीच्या सवयी, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (PMSBY), अटल निवृत्तीवेतन योजना (APY) या सारख्या विविध सरकारी योजना, ई-के वाय सी सारख्या बँकिंग सेवांचा वापर, डिजिटल व्यवहार तसेच, आर्थिक फसवणुकीपासून संरक्षण याबाबत शिक्षण देण्यात आले. या शिबिरादरम्यान, रिझर्व्ह बॅंकेतर्फे देण्यात येणारा  "आर बी आय सांगते, माहिती मिळवा, सतर्क रहा" हा संदेश विशेषकरून बिंबवण्यात आला.

शिबिरादरम्यान, तत्काळ बँक खाते उघडणे, विविध सरकारी योजनांमध्ये नावनोंदणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या; ज्यामुळे कामगारांना स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँकेच्या माध्यमातून औपचारिक वित्तीय सेवा आणि सामाजिक सुरक्षेचा लाभ घेण्यास मदत झाली.

स्थलांतरित कामगारांना, आर्थिक बाबींचे सुजाण निर्णय घेण्यास आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यास सक्षम करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. 


नितीन फुल्लुके/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर‍

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2257825) आगंतुक पटल : 80
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English