संरक्षण मंत्रालय
विश्वजित सहाय यांनी स्वीकारला संरक्षण वित्त सचिव पदाचा कार्यभार
प्रविष्टि तिथि:
01 MAY 2026 2:22PM by PIB Mumbai
भारतीय संरक्षण लेखा सेवा (आयडीएएस) 1990 च्या तुकडीचे अधिकारी विश्वजित सहाय यांनी 1 मे 2026 रोजी संरक्षण मंत्रालयात संरक्षण वित्त सचिव म्हणून पदभार स्वीकारला. या नियुक्तीपूर्वी ते संरक्षण लेखा महानियंत्रक (सीजीडीए) म्हणून कार्यरत होते.

दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि कायद्याचे पदवीधर असलेले विश्वजित सहाय यांना संरक्षण वित्त आणि सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील तीन दशकांहून अधिक अनुभव आहे.
आपल्या उल्लेखनीय कारकिर्दीत त्यांनी भारत सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात अतिरिक्त सचिव व वित्तीय सल्लागार, अवजड उद्योग विभागात संयुक्त सचिव, संरक्षण मंत्रालयाच्या अधिग्रहण विभागात वित्त व्यवस्थापक आणि माहिती व प्रसारण मंत्रालयात संचालक या पदांचा समावेश आहे.
संरक्षण लेखा विभागात त्यांनी प्रधान संरक्षण लेखा नियंत्रक (निवृत्तीवेतन), प्रयागराज, संयुक्त सीजीडीए आणि विशेष सीजीडीए अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
विश्वजित सहाय यांनी केंब्रिज विद्यापीठ (युनायटेड किंगडम) आणि जॉर्ज सी. मार्शल युरोपियन सेंटर फॉर सिक्युरिटी स्टडीज (जर्मनी) यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण मंचांवर भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे संरक्षण मंत्रालयातील वित्तीय व्यवस्थापन आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेला अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
***
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2257327)
आगंतुक पटल : 54