ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताने, सुमारे 256 गिगावॉट्स विजेची आतापर्यंतची सर्वोच्च मागणी कोणत्याही तुटवड्याविना पूर्ण केली

Posted On: 28 APR 2026 10:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2026

 

भारताने, दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी आतापर्यंतची सर्वोच्च ठरलेली 256.1 गिगावॉट्स विजेची मागणी कोणत्याही तुटवड्याविना पूर्ण केली आणि सोबतच शेजारी देशांना विजेची होणारी निर्यात देखील कायम राखली.

या महत्त्वाच्या टप्प्याने दिनांक 30 मे 2024 रोजी नोंदवल्या गेलेल्या 250 गिगावॉट्सच्या याआधीच्या सर्वाधिक मागणीचा टप्पा ओलांडला आणि गेल्या आर्थिक वर्षात 09 जानेवारी 2026 रोजी नोंदवण्यात आलेल्या 245.4 गिगावॉट्सच्या मागणीला मागे टाकले.

मागणीत दिसून आलेली ही वाढ देशभरात वाढलेल्या उन्हाळ्याला अनुसरून असून, एप्रिल 2026 या महिन्यात (1 ते 27 एप्रिल) वीज वापरामध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 8.9%ची लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

विजेच्या सर्वाधिक मागणीच्या या पूर्ततेला, आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान वीज उत्पादनात झालेल्या सुमारे 65 गिगावॉट्सच्या विक्रमी क्षमतावाढीचे पाठबळ लाभले असून, त्यातून एकंदर वीजनिर्मितीविषयक परिस्थिती बळकट झालेली आणि मोठ्या मागणीची स्थिती हाताळण्याच्या यंत्रणेच्या सज्जतेत वाढ झालेली दिसून येत आहे. यामुळे आपण यावर्षीची 270 गिगावॉट्सची अपेक्षित मागणी यशस्वीपणे पूर्ण करू शकू.

आधुनिक स्रोत पर्याप्ततेचे नियोजन, इष्टतम वेळापत्रकाचे पालन आणि उपलब्ध वीजनिर्मिती स्रोतांचे वितरण तसेच एनएलडीसी, आरएलडीसीज, एसएलडीसीज आणि वीजनिर्मिती केंद्रे यांच्या दृढ समन्वयासह पारेषण मार्गिकांचा कार्यक्षम वापर यांच्या मदतीने ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे.

सर्वात जास्त मागणीच्या वेळी, औष्णिक, जलविद्युत, अणुऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा यांच्यासह विविध ऊर्जा निर्मिती स्त्रोतांच्या माध्यमातून ही गरज पूर्ण करण्यात आली. नवीकरणीय ऊर्जा, विशेषतः सौर उर्जेचे यात लक्षणीय योगदान होते आणि त्याला सर्वोच्च मागणीच्या काळात जलविद्युत तसेच इतर लवचिक स्त्रोतांचा हातभार लागला.

सर्वोच्च मागणीच्या पूर्ततेच्या वेळी ग्रीडची वारंवारता आणि स्रोत-निहाय योगदान 

वेळ

15:38

अखिल भारतीय सर्वोच्च मागणीची पूर्तता

256117 मेगावॉट

ग्रीडची वारंवारता

50.00 हर्ट्झ

स्रोत

मेगावॉट (एक्स-बस) % (एकूण वीजनिर्मितीच्या)
वायू

5205

2.0%

जलविद्युत

11422

4.4%

 

अणुऊर्ज

 

6293

2.4%

औष्णिक

174565

66.9%

वारा

4897

1.9%

सौर

56204

21.5%

साठा (पीएसपी आणि बीईएसएस)

201

0.1%

इतर

2110

0.8%

 

* * *

शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2256422) अभ्यागत कक्ष : 9