ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र कार्यालयाने, ओएमएसएस अंतर्गत, ई-लिलाव आणि समर्पित अभियानाद्वारे, तांदळाच्या विक्रीला केली सुरुवात

Posted On: 28 APR 2026 8:02PM by PIB Mumbai

मुंबई, 28 एप्रिल 2026

 

एफसीआय म्हणजेच, भारतीय अन्न महामंडळाच्या, महाराष्ट्रातील प्रादेशिक कार्यालयाने ओएमएसएस म्हणजेच, मुक्त व्यापार विक्री योजनेअंतर्गत, ऑगस्ट 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून,  तांदळाची विक्री सुरू केली आहे. तांदळाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि किमती स्थिर राहाव्यात असा या विक्रीचा उद्देश आहे. तांदूळ ई-लिलाव तसेच, घाऊक बाजारात, थेट विक्रीच्या समर्पित मोहिमेद्वारे विकला जात आहे. ज्यांना तांदळाचा साठा विकत घ्यायला आहे, त्यांनी एफसी आय च्या ई-लिलाव सेवा प्रदाता, एम-जंक्शन सर्विसेस लिमिटेड वर, https://www.valuejunction.in/fci/, या पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करून घेणे आवश्यक आहे, तसेच, त्यांनी लिलाव प्रक्रियेत सहभागी होणेही आवश्यक आहे. ही नोंदणीची प्रक्रिया, विक्रीसाठी इच्छुक असलेल्यासाठी, 72 तासांत पूर्ण करण्यात येते.

येत्या 29 आणि 30 एप्रिलला नियोजित असलेल्या ई-लिलावात, महाराष्ट्रातील 10,000 मेट्रिक टन तांदळाची ओएमएसएस(डी) ई- लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे. व्यापारी, घाऊक खरेदीदार आणि उत्पादक या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्र आहेत. खरेदीच्या बोलीची किमान मर्यादा, प्रति ग्राहक, एक मेट्रिक टन आणि कमाल मर्यादा 7000 मेट्रिक टन इतकी आहे. त्याशिवाय, ओएमएसएस (डी) अंतर्गत, समर्पित अभियानाद्वारे, 50,000 मेट्रिक टन तांदूळ आणि 40,000 मेट्रिक टन, बिगर – एफआरके कस्टम मिल तांदूळ (सीएमआर) ज्यासोबत तुकडा तांदूळ – ज्यात, 10,000 मेट्रिक टन पंजाबचा आणि 30,000 मेट्रिक टन आंध्र प्रदेशचा तांदूळ आहे- त्यांची विक्रीही, ई-लिलावाद्वारे होणार आहे. घाऊक ग्राहक आणि व्यापारी, या श्रेणीत सहभागी होऊ शकतात, त्यांच्यासाठी किमान मर्यादा, 2,650 मेट्रिक टन इतकी आहे. यशस्वी खरेदीदारांना, त्यांच्याशी संबंधित महाव्यवस्थापकांना जिथे तांदूळ प्राप्त होणार आहे, अशा रेल्वे स्थानकाचे नाव कळवणे आवश्यक असेल. ओएमएसएस (डी) योजना, खुल्या बाजारातील तांदळाचा पुरवठा वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, पर्यायाने, वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि ग्राहकांना दिलासा मिळेल.

 

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2256371) अभ्यागत कक्ष : 62
Read this releasein: English