रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ उद्यापासून कायमस्वरूपी 20 बोगींसह धावणार

Posted On: 27 APR 2026 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2026

 

भारतीय रेल्वेने गाडी क्रमांक 22961/22962 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या बोगींची  संख्या 16 वरून 20 पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल दि. 28 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या प्रवासापासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर कार' (एसी-सीसी) आणि एका 'एक्झिक्युटिव्ह क्लास कोच' (ईसीसी) डब्याचा समावेश आहे. यामुळे भारतातील सर्वात गर्दीच्या आणि सर्वाधिक मागणी असलेल्या आंतर-शहरी रेल्वे मार्गांपैकी एक असलेल्या या गाडीच्या  प्रवाशांसाठी आसनांची उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ गाडी सेवा सुरू झाल्‍यापासून तिला मिळालेल्या सातत्यपूर्ण आणि प्रचंड प्रतिसादामुळे (मागणी असल्यामुळे) या गाडीला बोगी वाढविण्‍याचा हा निर्णय घेतला आहे. प्रवासाच्या गर्दीच्या काळात  वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी केलेली जी तात्पुरती वाढ होती, तिला आता कायमस्वरूपी परिचालन व्यवस्थेचे स्वरूप देण्यात आले आहे. भारतीय रेल्वेवर प्रवाशांनी जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला साजेसे आपली क्षमता वाढवण्याच्या रेल्वेच्या कटिबद्धतेचे हे एक प्रतीक आहे.

देशभरामध्‍ये आतापर्यंत, 162 वंदे भारत सेवा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद हा 491 किलोमीटरचा मार्ग आहे. वंदेभारत गाडी हा प्रवास 5 तास 30 मिनिटांत पूर्ण करते. वंदे भारत रेल गाडी बोरीवली, वापी, सुरत आणि वडोदरा येथे थांबते. हा मार्ग पश्चिम भारतातील मुंबई आणि अहमदाबाद या आर्थिकदृष्ट्या अत्यंत चैतन्यशील दोन शहरांना ही वेगवान रेल्वे जोडली आहे.

वंदे भारत गाड्यांची वाढती लोकप्रियता ही अनेक घटकांच्या संयोगाचा परिणाम आहे. हे घटक भारतातील प्रवासाच्या पद्धतीलाच नव्याने आकार देत आहेत.

मुंबई सेंट्रल-अहमदाबाद सेवेव्यतिरिक्त, गाडी क्रमांक 20901/20902 गांधीनगर राजधानी ते मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस धावते. ही रेल्वेगाडीही गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यातील आणखी एक महत्त्वाचा वेगवान दुवा आहे. गांधीनगरला मुंबईशी जोडणारा हा मार्ग, अहमदाबाद-गांधीनगरच्या विस्तृत क्षेत्रालाही सेवा पुरवतो. यामुळे व्यावसायिक, प्रशासकीय आणि दैनंदिन प्रवाशांना अधिक वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो, तसेच या दोन राज्यांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ होतात.

मुंबई सेंट्रल-अहमदाबाद सेवेचा 20 बोगींपर्यंत केलेला हा कायमस्वरूपी विस्तार, म्हणजे  प्रवाशांचे नेमके काय म्हणणे आहे, हे बारकाईने जाणून घेतले जाते अशा एका रेल्वे प्रणालीची कथा आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वे आत्मविश्वासाने आपली क्षमता वाढवत आहे आणि दररोज वंदे भारतला मोठ्या संख्‍येने  पसंती देणाऱ्या लक्षावधी भारतीयांना कधीही गाडीत आसनांविना राहावे लागणार नाही, याची खात्री करते.

 

* * *

निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2256091) अभ्यागत कक्ष : 17