अर्थ मंत्रालय
डीजीटीएसचा एअरपोर्ट 360 एक्स्पो 2026 मध्ये सहभाग; विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासात अप्रत्यक्ष करांच्या भूमिकेवर टाकला प्रकाश
मुंबईतील एअरपोर्ट 360 एक्स्पो 2026 मध्ये डीजीटीएसने उद्योगांसोबतचा संवाद केला अधिक दृढ
Posted On:
23 APR 2026 8:00PM by PIB Mumbai
मुंबई, 23 एप्रिल 2026
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) अखत्यारीतील करदाता सेवा महासंचालनालयाच्या (डीजीटीएस) मुंबई विभागीय युनिटने (एमझेडयू) मुंबईतील नेस्को इथल्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित एअरपोर्ट360 एक्स्पो 2026 मध्ये सहभाग घेतला.
या कार्यक्रमात, मुंबई विभागीय युनिटचे प्रधान अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांनी अधिकाऱ्यांबरोबर विमान वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि विमानतळ पायाभूत सुविधा क्षेत्रांतील भागधारकांशी संवाद साधला. या कार्यक्रमामुळे विमान वाहतूक क्षेत्र विकास, प्रवासी सुविधा, तंत्रज्ञान आणि नियामक चौकटी यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

कार्यक्रमादरम्यान सुमित कुमार यांनी “अप्रत्यक्ष कर आणि विमान वाहतूक उद्योग” या विषयावर व्याख्यान दिले. प्रवासी आणि मालवाहतूक सुलभ करणे, अनुपालन मजबूत करणे तसेच विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीस पाठिंबा देण्यात सीमाशुल्क तसेच वस्तू आणि सेवा कराच्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. जागतिक स्तरावरील प्रमुख विमान वाहतूक बाजारपेठांमध्ये भारताच्या स्थानावर भर देत, त्यांनी पारदर्शक, तंत्रज्ञान-आधारित कर प्रशासनाकडे होत असलेले संक्रमण अधोरेखित केले.
यावेळी, चेहराविरहित विश्लेषण, जोखीम व्यवस्थापन प्रणाली(आरएमएस), पेपरलेस प्रोसेसिंग, प्री-अरायव्हल डॉक्युमेंटेशन आणि आयसीगेट (ICEGATE) सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे 24×7 मंजुरी प्रणाली यांसारख्या प्रमुख सीमाशुल्क उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला. मुंबईतील मालवाहतूक सुलभतेमध्ये झालेल्या ड्वेल टाइम (थांबण्याचा वेळ) कमी होणे आणि जोखीम-आधारित अंमलबजावणी सुधारणांचीही त्यांनी उल्लेख केला.

कर एकसमानता, डिजिटल अनुपालन आणि देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) सेवांमधील सुसूत्रीकरण यांसारख्या विमान वाहतूक क्षेत्राशी संबंधित वस्तू आणि सेवा कर सुधारणांमुळे कार्यात्मक कार्यक्षमता आणि क्षेत्रीय वाढीला हातभार लागत असल्याचे त्यांनी नमूद केले
आधुनिक कर प्रशासनामध्ये डेटा-आधारित निर्णयक्षमता, तांत्रिक नवोन्मेष आणि भागधारकांशी सल्लामसलत यांच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला. सीमाशुल्क, विमान कंपन्या आणि विमानतळ ऑपरेटर यांच्यातील सहकार्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
सीबीआयसीचा एक समर्पित विभाग असलेल्या डीजीटीएस’ने करदात्यांमध्ये जागरूकता, हितधारकांचा सहभाग आणि तक्रार निवारणाला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान, डीजीटीएसच्या मुंबई विभागीय युनिटने (एमझेडयू) वेळेवर आणि प्रभावी तक्रार निवारण करत एकूण 62 जनसंपर्क कार्यक्रमांसह 44 सेमिनार/वेबिनार/हायब्रीड इव्हेंट्स आणि 18 संवाद सत्रांचे यशस्वी आयोजन केले.
अलीकडील जनजागृतीविषयक उपक्रमांमध्ये वस्तू आणि सेवा कर जागरूकता, करदात्यांच्या तक्रारींचे निवारण तसेच क्षेत्र निहाय संपर्क कार्यक्रमांचा समावेश आहे. शुल्क स्थगिती सुविधा (Duty Deferment Facility) आणि एईओ योजनेवरील (AEO Scheme) एक सत्र 24 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे.
डीजीटीएस विशेषतः, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी जागरूकता आणि सहभाग उपक्रमांद्वारे करदाते संपर्क अधिक मजबूत करण्याचे कार्य करत आहे.
* * *
पीआयबी मुंबई | राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2254987)
अभ्यागत कक्ष : 25