सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सांस्कृतिक मंत्रालया द्वारे "व्हीएम फ्रेम्स" राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

Posted On: 22 APR 2026 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2026

 

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 2025 मध्ये 150 वर्षे पूर्ण झाली. हा महत्वाचा टप्पा, सांस्कृतिक मंत्रालयाच्या पुढाकाराने, राज्ये, केंद्रशासित प्रदेश, विविध मंत्रालये, परदेशातील भारतीय दूतावास आणि जगभरातील नागरिकांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवा द्वारे साजरा केला जात आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताला भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जाणीवेमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. मातृभूमीला 'दैवी स्त्रीशक्ती' मानत, या गीताने दिलेला संदेश स्वातंत्र्यलढ्यादरम्यान अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आणि आजही तो राष्ट्र भावनेतून उमटत आहे.

व्हीएम फ्रेम्स

'व्हीएम फ्रेम्स' चित्रपट निर्माते, कलाकार आणि नागरिकांना 'वंदे मातरम' च्या तत्त्वज्ञानाचा समकालीन स्वरूपात पुनर्विचार करण्यासाठी प्रोत्साहन देत असून, ही स्पर्धा पुढील तीन श्रेणींमध्ये खुली आहे:

  • रील्स
  • एआय-आधारित चित्रपट
  • लघुपट

सहभागींना देशभक्ती, सांस्कृतिक ओळख, एकता आणि प्रगत 'नव्या भारता'च्या दृष्टीकोनावर आधारित संकल्पनांवर व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.

पुरस्कार आणि मान्यता

रील्स

  • प्रथम पारितोषिक: ₹ 1,50,000
  • द्वितीय पारितोषिक: ₹ 1,00,000
  • तृतीय पारितोषिक: ₹ 50,000

एआय चित्रपट

  • प्रथम पारितोषिक: ₹ 5,00,000
  • द्वितीय पारितोषिक: ₹3,00,000
  • तृतीय पारितोषिक: ₹ 1,50,000

लघुपट

  • प्रथम पारितोषिक: ₹ 15,00,000
  • द्वितीय पारितोषिक: ₹ 12,00,000
  • तृतीय पारितोषिक: ₹ 10,00,000

सहभागासाठी तपशील

  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 7 मे 2026
  • अधिक माहिती: vande mataram150.in 

देशाला आवाहन

'व्हीएम फ्रेम्स' च्या माध्यमातून, मंत्रालय नागरिकांना, विशेषतः युवा निर्मात्यांना या राष्ट्रीय मानवंदनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि भारताचा ऐतिहासिक वारसा आणि त्याची समकालीन सर्जनशील अभिव्यक्ती, याला जोडणाऱ्या सामूहिक सांस्कृतिक अभिव्यक्तीमध्ये योगदान देण्याचे आवाहन करत आहे.

भारत 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताचा 150 वा स्मरणोत्सव साजरा करत असताना, देशाच्या सामायिक वारशाबद्दलचा अभिमान पुन्हा जागा करणे आणि भारताच्या स्वातंत्र्याला आकार देणाऱ्या, तसेच आजही त्याचे भविष्य घडवणाऱ्या आदर्शांशी नव्याने जोडून घेण्याची प्रेरणा देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

 

* * *

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2254642) अभ्यागत कक्ष : 10