संरक्षण मंत्रालय
आत्मनिर्भर भारत: भारतीय लष्कराची सुरुंगक्षेत्र भेदण्याची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने टी-72/टी-90 प्रकारच्या रणगाड्यांसाठी आवश्यक टीआरएडब्ल्यूएल जुळवणीसाठी (ट्रॉल असेंबली) 975 कोटी रुपयांचे करार केले
Posted On:
21 APR 2026 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2026
टी-72/टी-90 प्रकारच्या रणगाड्यांसाठी आवश्यक टीआरएडब्ल्यूएल जुळवणीच्या (ट्रॉल असेंबली) खरेदीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) आणि इलेक्ट्रो न्युमॅटीक्स अँड हायड्रॉलिक्स (भारत) प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांशी 975 कोटी रुपयांचे करार केले आहेत. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे आज, 21 एप्रिल 2026 रोजी या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
टी-72/टी-90 प्रकारच्या रणगाड्यांसाठी आवश्यक टीआरएडब्ल्यूएल जुळवणी हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेले अत्यंत महत्त्वाचे उपकरण असून ते भारतीय लष्कराची सुरुंगक्षेत्र भेदण्याची क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या जुळवणीच्या वापरामुळे प्रॉक्झिमिटी मॅग्नेटीक फ्यूज असलेले रणगाडाविरोधी सुरुंग पेरलेल्या क्षेत्रातून जाताना वाहनासाठी सुरक्षित मार्ग निर्माण करण्याची अतिरिक्त क्षमता निर्माण होईल आणि त्यायोगे भारतीय लष्कराच्या परिचालनात्मक परिणामकारकतेत सुधारणा होईल.
भारतीय बनावटीची, स्वदेशी पद्धतीने संरचित, विकसित आणि निर्मित अशा प्रकारच्या या जुळवणीची खरेदी म्हणजे भारताच्या संरक्षण विषयक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या आणि स्वदेशी कंपन्यांना सक्षम करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असून ते आत्मनिर्भर भारताचा अभिमानी ध्वजवाहक बनेल .या प्रकल्पामध्ये सुट्या भागांच्या उत्पादनाच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांना प्रोत्साहन देऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची अमर्याद क्षमता आहे.
LFAU.JPG)


सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2254223)
अभ्यागत कक्ष : 13