राज्यसभा सचिवालय
राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून डॉ. के. एस. सोमशेखर यांची राज्यसभा सचिवालयात सचिव म्हणून नियुक्ती
प्रविष्टि तिथि:
18 APR 2026 4:59PM by PIB Mumbai
राज्यसभेचे सभापती सी. पी राधाकृष्णन यांनी डॉ. के. एस. सोमशेखर यांची राज्यसभा सचिवालयात सचिव म्हणून नियुक्ती केली असून, ही नियुक्ती 18 एप्रिल 2026 पासून लागू झाली आहे.
1993 मध्ये सचिवालयात रुजू झालेले डॉ. सोमशेखर यांनी अतिरिक्त सचिव, संयुक्त सचिव आणि संचालक यांसह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांना संसदीय भाषांतर, प्रशासन आणि समिती कामकाजाचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी कर्नाटक सरकारमध्येही वरिष्ठ पदांवर सेवा बजावली असून आंतरराष्ट्रीय संसदीय मंचांवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी युनायटेड किंगडम आणि युरोपियन युनियनमध्ये संसदीय पद्धतींचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे, तसेच जिनिव्हा येथे झालेल्या आंतर-संसदीय संघाच्या बैठकांमध्येही सहभाग घेतला आहे.
डॉ. सोमशेखर यांनी साहित्यात पीएचडी पदवी प्राप्त केली असून कन्नड, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि तमिळ या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांच्या या समृद्ध प्रशासकीय आणि शैक्षणिक अनुभवाचा लाभ त्यांच्या नवीन भूमिकेत सचिवालयाला मिळेल.


***
माधुरी पांगे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2253361)
आगंतुक पटल : 47