युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
बीकेसी मुंबई येथे “नारी शक्ती फॉर विकसित भारत रन” 18 एप्रिल रोजी
‘नारी शक्ती वंदन’ अंतर्गत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
देशभरातील सात शहरांमध्ये 35,000 हून अधिक महिला होणार सहभागी
Posted On:
17 APR 2026 5:39PM by PIB Mumbai
पीआयबी मुंबई , 17 एप्रिल 2026
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या (MYAS) वतीने “नारी शक्ती फॉर विकसित भारत रन” चे आयोजन बीकेसी, मुंबई येथे शनिवारी, 18 एप्रिल 2026 रोजी करण्यात येणार आहे. हा उपक्रम देशभरातील सात प्रमुख शहरांमध्ये, बंगळुरू, मुंबई, पटना, कटक, दिल्ली, जयपूर आणि इंदौर येथे एकाच वेळी आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती मेरा युवा भारत, महाराष्ट्र राज्य संचालक अमित पुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपसंचालक अनुप इंगोले आणि लेखाधिकारी मदन घेघाटे उपस्थित होते.

मुंबईतील या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, आणि आमदार अमित साटम यांची प्रमुख उपस्थिती असेल. सकाळी 6:30 वाजता सहभागींची नोंदणी प्रक्रिया सुरु होईल. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिक ‘नारी शक्ती प्रतिज्ञा’ घेण्यात येईल. सकाळी 7:30 वाजता दौड प्रारंभ होईल, असे मेरा युवा भारत चे संचालक अमित पुंडे यांनी सांगितले.
2.2 किलोमीटर अंतराच्या “नारी शक्ती फॉर विकसित भारत रन” ला बीकेसी मुंबई येथील अव्हेन्यू 5 रोड, परिनी क्रेसेंझो इमारत, येथून सुरुवात होऊन श्री. धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूल पर्यंत जाऊन पुन्हा प्रारंभ बिंदूपर्यंत परत येईल. या दौडमध्ये सुमारे 3,000 महिलांचा सहभाग अपेक्षित आहे. सर्व सहभागींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम मेरा युवा भारत, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) तसेच विविध भागीदार संस्थांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर राबविण्यात येत आहे.
“नारी शक्ती फॉर विकसित भारत रन” हा उपक्रम महिलांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी राबविण्यात येत असून, यामध्ये विद्यार्थीनी, महिला, आध्यात्मिक संस्थांच्या सदस्य, स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक, उद्योजिका, क्रीडापटू आणि विविध सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सहभाग असेल, असेही ते म्हणाले.
***
नितीन फुल्लुके/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2253035)
अभ्यागत कक्ष : 34