वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एकूण निर्यात 860.09 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होईल,असा अंदाज; मागीलआर्थिक वर्षाच्या तुलनेत 4.22 % अंदाजित वाढ

Posted On: 15 APR 2026 9:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2026

मार्च 2026* साठी भारताची एकूण निर्यात (वस्तू आणि सेवा एकत्रित) 74.11 अब्ज अमेरिकी डॉलर होईल, असा  अंदाज आहे.  ही निर्यात  मार्च 2025 च्या तुलनेत (-) 4.58 टक्के नकारात्मक वाढ दर्शवते. मार्च 2026* साठी एकूण आयात (वस्तू आणि सेवा एकत्रित) 76.55 अब्ज अमेरिकी डॉलर असण्याचा अंदाज आहे, जी मार्च 2025 च्या तुलनेत (-) 5.76 टक्के नकारात्मक वाढ दर्शवते.

Table 1: Trade during March 2026*

 

 

March 2026

(US$ Billion)

March 2025

(US$ Billion)

Merchandise

Exports

38.92

42.05

Imports

59.59

63.74

Services*

Exports

35.20

35.63

Imports

16.96

17.48

Total Trade

(Merchandise +Services) *

Exports

74.11

77.67

Imports

76.55

81.22

Trade Balance

-2.44

-3.55

· आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल-मार्च)* दरम्यान भारताची एकूण निर्यात 4.22 टक्के सकारात्मक वाढ नोंदवत 860.09 अब्ज अमेरिकी डॉलर असण्याचा अंदाज आहे.

आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल-मार्च)* दरम्यान एकूण आयात 6.47 टक्के वाढ नोंदवत 979.40 अब्ज अमेरिकी डॉलर राहण्याचा अंदाज आहे.

Table 2: Trade during FY 2025-26 (April-March)*

 

 

FY 2025-26

(US$ Billion)

FY 2024-25

(US$ Billion)

Merchandise

Exports

441.78

437.70

Imports

774.98

721.20

Services*

Exports

418.31

387.55

Imports

204.42

198.72

Total Trade

(Merchandise +Services) *

Exports

860.09

825.26

Imports

979.40

919.92

Trade Balance

-119.30

-94.66

वस्तू व्यापार

· मार्च 2026 मध्ये वस्तूंची निर्यात 38.92 अब्ज अमेरिकी डॉलर होती, तर मार्च 2025 मध्ये ती 42.05 अब्ज अमेरिकी डॉलर होती.

· मार्च 2026 मध्ये वस्तूंची आयात 59.59 अब्ज अमेरिकी डॉलर होती, तर मार्च 2025 मध्ये ती 63.74 अब्ज अमेरिकी डॉलर होती.  

· वस्तूंची निर्यात आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल-मार्च) दरम्यान 437.70 अब्ज अमेरिकी डॉलर होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल-मार्च) दरम्यान ती 441.78 अब्ज अमेरिकी डॉलर होती.  

· वस्तूंची आयात आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल-मार्च) दरम्यान 721.20 अब्ज अमेरिकी डॉलर होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल-मार्च) दरम्यान ती 774.98 अब्ज अमेरिकी डॉलर होती. 

· आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल-मार्च) दरम्यान वस्तूंची व्यापार तूट 283.50 अब्ज अमेरिकी डॉलर होती, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल-मार्च) दरम्यान ती 333.19 अब्ज अमेरिकी डॉलर राहिली. 

सेवा व्यापार

· मार्च 2026* साठी सेवा निर्यातीचे अंदाजित मूल्य 35.20 अब्ज अमेरिकी डॉलर आहे, तर मार्च 2025 मध्ये ते 35.63 अब्ज अमेरिकी डॉलर होते.

· मार्च 2026* साठी सेवा आयातीचे अंदाजित मूल्य 16.96 अब्ज अमेरिकी डॉलर आहे, तर मार्च 2025 मध्ये ते 17.48 अब्ज अमेरिकी डॉलर होते.

· आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल-मार्च)* दरम्यान सेवा निर्यातीचे अंदाजित मूल्य 418.31 अब्ज अमेरिकी डॉलर आहे, त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल-मार्च) मध्ये ते 387.55 अब्ज अमेरिकी डॉलर इतके राहिले. 

· आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल-मार्च)* दरम्यान सेवा आयातीचे अंदाजित मूल्य 204.42 अब्ज अमेरिकी डॉलर आहे, तर आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल-मार्च) मध्ये ते 198.72 अब्ज अमेरिकी डॉलर होते.

· आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल-मार्च)* मध्ये आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल-मार्च) च्या तुलनेत सेवा निर्यातीत 7.94 टक्के वाढ होईल असा अंदाज आहे.

· मार्च 2026 मध्ये मार्च 2025 च्या तुलनेत मूल्यातील बदलाच्या बाबतीत सकारात्मक वाढ दर्शवणारी अव्वल 5 निर्यात स्थळे सिंगापूर (158.55%), मलेशिया (84.47%), चीन (28.1%), टांझानिया (100.54%) आणि श्रीलंका (88.31%) आहेत.

· आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल-मार्च) मध्ये आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल-मार्च) च्या तुलनेत मूल्यातील बदलाच्या बाबतीत सकारात्मक वाढ दर्शवणारी अव्वल 5 निर्यात स्थळे चीन पी आर पी (36.66%), स्पेन (46.33%), हाँगकाँग (33.22%), व्हिएतनाम प्रजासत्ताक (22.78%) आणि श्रीलंका डीएसआर (21.14%) आहेत.  

· मार्च 2025 च्या तुलनेत मार्च 2026 मध्ये मूल्यातील बदलाच्या दृष्टीने वाढ दर्शवणारे अव्वल 5 आयात स्रोत चीन,थायलंड, पेरू, ओमान आणि अमेरिका आहेत. 

त्वरित अंदाजांसाठी लिंक:  -

सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2252372) अभ्यागत कक्ष : 15