पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालियनवाला बागेतील शहीदांना वाहिली आदरांजली
पंतप्रधानांनी चांगल्या आणि कल्याणकारी शक्तींचे संवर्धन करण्याविषयीचे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले
Posted On:
13 APR 2026 12:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जालियनवाला बागेतील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांचे बलिदान हे आपल्या लोकांच्या अदम्य जिद्दीची एक प्रबळ आठवण म्हणून कायम स्मरणात राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी आज एक संस्कृत सुभाषित देखील सामायिक केले असून राष्ट्राला समृद्ध, जागरुक आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी कष्टाळू लोकांनी समाजात चांगल्या आणि कल्याणकारी शक्तींचे संवर्धन करावे आणि समाजात दुही, अन्याय आणि असंतोष निर्माण करणाऱ्या विघातक शक्तींचा ठामपणे प्रतिकार करावा असा या सुभाषिताचा अर्थ आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर केलेल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे:
"आजच्या दिवशी आपण जालियनवाला बाग हत्याकांडातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत. त्यांचा त्याग हा आपल्या लोकांच्या अदम्य जिद्दीची एक प्रबळ आठवण म्हणून कायम स्मरणात राहील. त्यांनी दाखवलेले धैर्य आणि दृढनिश्चय येणाऱ्या कित्येक पिढयांना स्वातंत्र्य, न्याय आणि प्रतिष्ठा ही मूल्ये अंगिकारण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
जालियनवाला बाग हत्याकांडातील सर्व अमर हुतात्म्यांना माझी आदरपूर्वक श्रद्धांजली. परकीय राजवटीच्या क्रूरतेविरुद्ध त्यांनी दाखवलेल्या अदम्य धैर्याची आणि स्वाभिमानाची गाथा या देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
इन्द्रं वर्धन्तो अप्तुरः कृण्वन्तो विश्वमार्यम्।
अपघ्नन्तो अराव्णः॥"
सर्व कष्टाळू लोकांनो, राष्ट्राला समृद्ध, जागृत आणि आत्मनिर्भर बनवणाऱ्या चांगल्या आणि हितकारक गोष्टींची जोपासना करा, त्यांचे संवर्धन करा. आणि त्याच वेळी समाजात दुही, अन्याय आणि असंतोष पसरवणाऱ्या विघातक शक्तींचा ठामपणे प्रतिकार करा.
* * *
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2251466)
अभ्यागत कक्ष : 8
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada