रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रस्ते सुरक्षा जनजागृती ही एक राष्ट्रीय चळवळ असून, रस्ते वापरणाऱ्या सगळ्यांनीच जबाबादारीने वागण्याची अपेक्षा: रस्ते वाहतूक राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा

Posted On: 09 APR 2026 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2026

रस्ते सुरक्षाविषयक जनजागृती उपक्रम, केवळ समारंभ नाहीत, तर एका व्यापक राष्ट्रीय मोहिमेचा अविभाज्य घटक असून, त्याचा उद्देश, देशभरात, रस्त्यांचा वापर अधिकाधिक जबाबदारीने करण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करणे हा आहे, असे प्रतिपादन, रस्ते वाहतूक,  महामार्ग आणि कार्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी केले.

रस्ते सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि जबाबदार चालकत्व विषयीची मानसिकता तयार करण्यासाठी त्यांचा, विभाग कटिबद्ध आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. 

तिसऱ्या उत्तराखंड साहसी राईडला त्यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केले, त्यावेळी ते बोलत होते. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ने ही सफर आयोजित केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी   नेतृत्वाखाली आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने, रस्ते वाहतुकीत मोठी प्रगती केली आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र रस्ते सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून नागरिकांच्या वर्तणूकीवर ते अवलंबून आहे, असे ते म्हणाले. दरवर्षी, 1.8 लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, असेही त्यांनी नमूद केले.

या संदर्भात सरकारच्या सक्रिय आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाविषयी संगत, त्यांनी 4-E धोरणाची माहिती दिली. अभियांत्रिकी, अंमलबजावणी, शिक्षण आणि आपत्कालीन काळजी या चार स्तंभावर, रस्ते सुरक्षेचा आराखडा आधारलेला आहे, असे ते म्हणाले.

युवकांच्या प्रतिसादावर भर देत, मल्होत्रा यांनी, संवादात्मक सत्रे आणि जनजागृती कार्यक्रमातून, त्यांची जाणीवजागृती केली जाते, असे सांगितले.

रस्ते वापरणाऱ्या सर्वांनी,वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.


निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2250635) अभ्यागत कक्ष : 19