कायदा आणि न्याय मंत्रालय
कायदेमंडळ विभागाच्या वतीने स्वच्छता पंधरवडा 2026 निमित्त कचर्यापासून संपत्ती या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
09 APR 2026 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2026
स्वच्छता पंधरवड्यानिमित्त, विधी आणि न्याय मंत्रालयाच्या कायदेमंडळ विभागाने आज दि. 9 एप्रिल 2026 रोजी कचर्यापासून संपत्ती या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. शास्त्री भवनाच्या विंग-ए मधील, चौथ्या मजल्यावरील परिषद सभागृह क्रमांक 440-ए मध्ये ही कार्यशाळा पार पडली. कचऱ्याचे मौल्यवान उत्पादनांमध्ये रूपांतर करण्याच्या नवोन्मेषी कल्पना आणि शाश्वत कार्यपद्धतींचा प्रचार प्रसार करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता.
या निमित्ताने कचऱ्याचे उपयुक्त वस्तूंमध्ये प्रभावीपणे रूपांतर कसे करता येईल यावर एका विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रातील तज्ञ वक्त्यांनी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनात त्यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेल्या झुलत्या कुड्यांसारखी विविध प्रात्यक्षिके सादर केली. कायदेमंडळ विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह विभागाशी संलग्न असलेली राजभाषा विभाग, विधी साहित्य प्रकाशन विभाग अशा कार्यालयामधील कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या निमित्ताने प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेल्या झुलत्या कुड्यांसह कचऱ्यापासून तयार केलेल्या विविध वस्तू कायदेमंडळ विभागाचे सचिव डॉ. राजीव मणी यांना भेट म्हणून देण्यात आल्या. डॉ. राजीव मणी यांनी या माहितीपूर्ण सत्राबद्दल तज्ज्ञांचे कौतुक केले. सरकारी कार्यालयांमध्ये शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले, तसेच या नवोन्मेषी दृष्टिकोनाचीही त्यांनी प्रशंसा केली.




निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2250629)
आगंतुक पटल : 73