शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

53 व्या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी 2025-26 ची पुण्यात सुरुवात


नवोन्मेष, संशोधन आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल

Posted On: 09 APR 2026 5:52PM by PIB Mumbai

पुणे, 9 एप्रिल 2026

53 वी, राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी 2025-26 आजपासून पुण्यात सुरू झाली. केंद्रीय विद्यालय संगठनने आयोजित केलेले हे तीन दिवसीय प्रदर्शन, 8 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान, पीएम श्री केंद्रीय विद्यालय गणेशखिंड इथे होत आहे.

या प्रदर्शनातून, देशभरातल्या 25 केंद्रीय विद्यालयांमधील, उदयोन्मुख 571 विद्यार्थी वैज्ञानिकांना त्यांचे वैज्ञानिक कौशल्य आणि सर्जनशीलता दाखवण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधक वृत्ती वाढवणे, हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

यंदाच्या प्रदर्शनाची संकल्पना,“विकसित आणि आत्मनिर्भर भारत” अशी असून, देश स्वयंपूर्ण बनवण्यासाठीची  मॉडेल्स आणि त्यासाठीचे  प्रयोग यात मांडण्यात आले आहेत.

प्रदर्शनातील मुख्य आकर्षणामध्ये खालील गोष्टी आहेत:

* विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित मॉडेल्स

*  पर्यावरण संवर्धनावरील प्रकल्प

*  अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित नवोन्मेष

* कृषी आणि आरोग्यक्षेत्राशी संबंधित प्रयोग.

प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि एआरडीईचे सहयोगी संचालक, आर. पी. पांडे यांनी, सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विज्ञान क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, जिज्ञासा , अविरत कष्ट आणि सातत्यपूर्ण प्रयोगशीलता आवश्यक असते, यावर त्यांनी भर दिला.

केंद्रीय विद्यालयाच्या दिल्ली मुख्यालयाचे सह आयुक्त, (शिक्षण) सौमित श्रीवास्तव, आभासी पद्धतीने ह्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी वेगवेगळे प्रयोग मांडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच, अ-पारंपरिक ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत, त्यांनी उत्तम आरोग्य राखण्याचाही सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

केव्हीएस च्या मुंबई कार्यालयाचे उपायुक्त, बी.के. बेहरा, सह आयुक्त, सुमित मेहरा, आणि यजमान शाळेचे मुख्याध्यापक अविजित पांडा, विविध केंद्रीय विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षण आणि परीक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आपल्या स्वागतपर भाषणात, बी. के. बेहरा यांनी विद्यार्थ्यांना परिवर्तन घडवणारे होण्यासाठी प्रोत्साहन देत, वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत असा भारत घडवण्यात योगदान देण्याचे आवाहन केले. तर सुमित मेहरा यांनी, विद्यार्थ्यांना, नवनवे तंत्रज्ञान शिकण्याचा, प्रयोगशील राहण्याचा आणि आपल्या कल्पना आत्मविश्वासाने मांडण्याचा सल्ला दिला.

अविजित पांडा यांनी विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र घडवण्यासाठी स्टेम STEM शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

उद्घाटन समारंभात पुण्यातील विविध केंद्रीय विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले.

हे प्रदर्शन विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देत नाही, तर त्यांना नवे काही शिकण्यासाठी, शोध घेण्यासाठी आणि भविष्यातील शास्त्रज्ञ होण्याची प्रेरणा देणारेही आहे.

निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2250524) अभ्यागत कक्ष : 88
Read this releasein: English