परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुणे येथील एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 ते 17 एप्रिल 2026 दरम्यान पासपोर्ट मोबाईल व्हॅन सेवा

Posted On: 06 APR 2026 8:03PM by PIB Mumbai

पुणे, 6 एप्रिल 2026

पुणे येथील प्रादेशिक पारपत्र कार्यालय 15, 16 आणि 17 एप्रिल 2026 रोजी पुणे येथील एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात पारपत्र  सेवा उपलब्ध करून देणार आहे.

पारपत्रासाठी नियोजित वेळेची सोय लवकर उपलब्ध करून देणे आणि पारपत्र वितरण सेवा सर्वदूर सहज देता यावी या उद्देशाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालय करत असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

कागदपत्रे: कृपया अर्ज ऑनलाइन सादर करण्यापूर्वी, प्रौढ आणि अल्पवयीन अशा दोन्ही अर्जदारांसाठी दिलेल्या तपाससूची (checklists) काळजीपूर्वक वाचा.

अर्जदाराची सत्यता तपासण्यासाठी, पारपत्र कायदा 1967 च्या कलम 5 अन्वये तसेच पारपत्र नियम 1980 च्या नियम 5 नुसार, पारपत्र प्राधिकरणाला अर्ज  निकाली काढण्यासाठी आवश्यक वाटल्यास सर्व प्रकारची चौकशी करण्याचा तसेच अर्जदाराकडून अतिरिक्त माहिती आणि कागदपत्रे मागवण्याचा अधिकार आहे. 

मोबाइल व्हॅनसाठी अपॉइंटमेंट कशी बुक करावी:

i) (https://www.passportindia.gov.in) या  पासपोर्ट इंडिया या संकेतस्थळाला  भेट द्या आणि 'NORMAL' योजनेअंतर्गत अर्ज सादर करा.

ii) ऑनलाइन पेमेंट पूर्ण केल्यानंतर शेड्यूल अपॉइंटमेंट पेज वर जा, लोकेशनमध्ये मोबाइल व्हॅन हा पर्याय निवडा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा.

पासपोर्ट मोबाईल सेवा केंद्राचे स्थळ आणि वेळ यांचा तपशील:

i) दिनांक: 15, 16 आणि 17 एप्रिल 2026

ii) ठिकाण: ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (एआयएसएसएमएस), 1, केनेडी रोड, आरटीओ कार्यालयाजवळ, रेल्वे ऑफिसर्स कॉलनी, पुणे 411001.

iii) वेळ: 08:30 ते 18:00 वाजेपर्यंत (अर्जदारांनी, ऑनलाईन अर्जाच्या पावतीवर नमूद केलेल्या त्यांच्या नियोजित भेटीच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी उपस्थित राहावे)

 

निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2249473) अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein: English