सांस्कृतिक मंत्रालय
संसदेतील प्रश्न: महाराष्ट्रातील सांस्कृतिक पायाभूत सुविधांचा विकास
Posted On:
02 APR 2026 5:04PM by PIB Mumbai
सांस्कृतिक मंत्रालय महाराष्ट्र राज्यातील संग्रहालयांचे जतन आणि विकास तसेच नवीन ग्रंथालयांच्या स्थापनेसाठी वचनबद्ध आहे.सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत असलेल्या राजा राममोहन रॉय लायब्ररी फाऊंडेशन (आरआरआरएलएफ ) द्वारे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी आर्थिक मदत पुरवली जाते.
ही संस्था ग्रंथालयातील संसाधने सुधारणे, फर्निचर खरेदी करणे, इमारतींचे बांधकाम, चिल्ड्रन्स आणि नॉलेज कॉर्नर्सची स्थापना, दिव्यांग वाचकांसाठी सुविधा निर्माण करणे आणि संगणक, प्रिंटर आणि इतर उपकरणांद्वारे ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी पाठबळ देते.
महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षांत आरआरआरएलएफ च्या विविध योजनांतर्गत वितरित करण्यात आलेली आर्थिक मदत खालीलप्रमाणे आहे:-
|
वर्ष
|
जारी करण्यात आलेल्या आर्थिक सहाय्याची रक्कम(लाख रुपयात)
|
सहाय्य पुरवलेल्या ग्रंथालयांची संख्या
|
|
2020-21
|
180.65
|
1675
|
|
2021-22
|
166.73
|
12219
|
|
2022-23
|
86.23
|
55
|
|
2023-24
|
173.89
|
1111
|
|
2024-25
|
112.84
|
213
|
त्याबरोबरच, ग्रंथालय सेवांच्या आधुनिकीकरणासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना मदत" या योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या शिफारसकृत अर्जांच्या आधारे, राजा राममोहन रॉय लायब्ररी फाऊंडेशन द्वारे महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी वितरित करण्यात आलेली आर्थिक मदत आणि लाभ मिळालेल्या ग्रंथालयांची संख्या खालीलप्रमाणे आहे:
|
वर्ष
|
जारी करण्यात आलेल्या आर्थिक सहाय्याची रक्कम(लाख रुपयात)
|
सहाय्य मिळालेल्या ग्रंथालयांची संख्या
|
|
2020-21
|
247.02
|
404
|
|
2021-22
|
0
|
0
|
|
2022-23
|
0
|
0
|
|
2023-24
|
105.00
|
150
|
|
2024-25
|
120.00
|
160
|
राष्ट्रीय ग्रंथालय मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील दोन ग्रंथालयांचा विकास करण्यात आला आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे :
|
ग्रंथालयाचे नाव
|
मंजूर निधी
(लाख रुपयात)
|
जारी केलेला एकूण निधी
(लाख रुपयात)
|
गेल्या 5 वर्षात जारी केलेला निधी (लाख रुपयात)
|
शेरा
|
|
जिल्हा ग्रंथालय, नंदुरबार
|
21.90
|
18.43
|
2.68
|
प्रकल्प पूर्ण झाला आहे.
|
|
सरकारी विभागीय ग्रंथालय, औरंगाबाद
|
60.55
|
57.21
|
17.35
|
मौल्यवान दस्तऐवजीकृत वारशाचे जतन आणि अभिलेखीय दस्तऐवजांची सहजतेने व्यापक उपलब्धता या उद्देशाने, सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराद्वारे अभिलेखीय दस्तऐवजांच्या डिजिटायझेशनचे काम हाती घेतले जात आहे
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, अभिलेखीय नोंदी पद्धतशीरपणे डिजिटल केल्या जात आहेत आणि त्यांचा मेटाडेटा तयार करून तो ' अभिलेखीय माहिती व्यवस्थापन प्रणाली' मध्ये एकत्रित केला जात आहे. हे डिजिटल केलेले दस्तावेज 'अभिलेख पटल' (Abhilekh Patal) या पोर्टलद्वारे उपलब्ध करून दिले जात आहेत, जे अभिलेखीय संसाधनांसाठी एक राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून काम करते.
गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये ' ग्रंथालय अनुदान योजनेअंतर्गत संग्रहालयांच्या विकासाचा वर्षनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे:
|
अनु.
|
राज्य
|
संघटनेचे नाव
|
संग्रहालयाचे नाव
|
संग्रहालयाचा प्रकार
|
| |
महाराष्ट्र
|
फंड्स अँड प्रॉपर्टीज ऑफ द पारसी पंचायत बॉम्बे, फ्रामजी दादाभाई आलपीवाला संग्रहालय, डॉ. दादाभाई नवरोजी रोड, फोर्ट, मुंबई
|
विद्यमान
|
विद्यमान संग्रहालयाचा विकास
|
| |
एशियन कल्चरल म्युझियमच्या विकासासाठी सिम्बॉयसिस सोसायटी, पुणे
|
विद्यमान
|
विद्यमान संग्रहालयाचा विकास
|
भारतीय पुराभिलेख सर्वेक्षण
|
अनु.
|
राज्य
|
संघटनेचे नाव
|
संग्रहालयाचा प्रकार
|
संग्रहालयाचा प्रकार
|
| |
महाराष्ट्र
|
महात्मा गांधी संग्रहालय, आगा खान पॅलेस, पुणे, महाराष्ट्र
|
विद्यमान
|
विद्यमान संग्रहालय
|
सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज (02 एप्रिल 2026) राज्यसभेत ही माहिती सादर केली.
***
निलिमा चितळे/शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
Goa
Follow us on social media:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pibpanaji
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBPanaji
/pibpanaji
(Release ID: 2248544)
अभ्यागत कक्ष : 31