कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घेतली भेट

Posted On: 27 MAR 2026 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 मार्च 2026

 

महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रय विठोबा भरणे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांनी राज्यात सुरू असलेल्या विविध योजनांच्या प्रगतीची माहिती दिली. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी, विशेषत: कृषी यांत्रिकीकरण आणि ठिबक सिंचनासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी त्यांनी विनंती केली.

भरणे यांनी, केंद्रीय कृषिमंत्र्यांना अवकाळी पावसामुळे राज्याच्या किनारपट्टी भागात झालेल्या आंबा आणि काजू पिकाच्या नुकसानीची माहिती दिली. या संदर्भात, नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पथकाने राज्याला यापूर्वीच भेट दिली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन, राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अधिकाधिक लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

'विकसित कृषी संकल्प अभियाना' अंतर्गत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी 52 पथके स्थापन करण्यात आली असून, त्यांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला जात असल्याची माहिती शिवराज सिंह चौहान यांनी दिली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा (आरकेव्हीवाय) जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी राज्याने सक्रिय पावले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

या बैठकीत महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांनी राज्यात यंदा कांद्याचे अधिक उत्पादन झाल्याची माहिती दिली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कांद्याची  थेट खरेदीची व्यवस्था करण्याचे आवाहनही केले. यावर योग्य ती पावले उचलली जातील, असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिले.

 

केंद्रीय कृषि मंत्री श्री शिवराज सिंह चौहान से महाराष्ट्र के कृषि मंत्री ने की मुलाकात

* * *

सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2246319) अभ्यागत कक्ष : 28
Read this releasein: English