पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित केले सामायिक; सिद्धीदात्री मातेचे घेतले आशीर्वाद
Posted On:
27 MAR 2026 10:44AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी माता सिद्धिदात्रीचे आशीर्वाद घेतले आणि तिच्या सर्व भक्तांना त्यांची ध्येयप्राप्ती होण्यासाठी आशीर्वाद देण्याची प्रार्थना केली.
पंतप्रधान म्हणाले की देवीच्या उपासनेद्वारे भक्तांमध्ये एक विलक्षण शक्ती प्रवाहित होते, जी त्यांना यशप्राप्तीच्या आत्मविश्वासाने भरून टाकते.
पंतप्रधानांनी एक संस्कृत श्लोक सामायिक केला-
“सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी॥”
एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“माता सिद्धीदात्रीला वंदन! देवी माता तिच्या सर्व भक्तांना यश प्राप्तीचा आशीर्वाद देवो हेच मागणे तिच्याकडे मागतो.
सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी॥”
“देवीमातेची भक्ती केल्यामुळे भक्तांमध्ये अद्भुत शक्ती संचारते. ही शक्ती त्यांना यशप्राप्तीच्या आत्मविश्वासाने भरून टाकते.”
***
NehaKulkarni / SanjanaChitnis / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2245915)
अभ्यागत कक्ष : 52
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam