रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अमृत भारत सेवांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, 2025-26 या वर्षात (10.03.2026 पर्यंत) 100% पेक्षा जास्त क्षमतेने प्रवाशांची वाहतूक: केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची लोकसभेत माहिती

Posted On: 26 MAR 2026 7:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 मार्च 2026

 

कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना प्रवासासाठी वाहतुकीचे परवडणारे साधन उपलब्ध करून देण्यासाठी, भारतीय रेल्वेने अमृत भारत सेवा सुरू केली असून त्या पूर्णपणे आधुनिक अवातानुकूलित गाड्या आहे. अमृत भारतच्या सध्याच्या रचनेत सर्वसाधारण श्रेणीचे 11 डबे, स्लीपर श्रेणीचे 8 डबे, 1 पॅन्ट्री कार आणि 02 लगेज कम दिव्यांगजन डब्यांचा समावेश आहे.

18.03.2026 पर्यंत, भारतीय रेल्वेच्या नेटवर्कमध्ये पुढील 60 अमृत भारत एक्सप्रेस सेवांचे परिचालन करण्यात येत आहे:

अ.क्र.

रेल्वे क्रमांक आणि नाव

1

11015/11016 लोकमान्य टिळक (टी) - सहरसा अमृत भारत एक्सप्रेस

2

13697/13698 गया - दिल्ली अमृत भारत एक्सप्रेस

3

15293/15294 मुझफ्फरपूर - चारलापल्ली अमृत भारत एक्सप्रेस

4

15557/15558 दरभंगा - आनंद विहार (टी) अमृत भारत एक्सप्रेस

5

15561/15562 दरभंगा - गोमतीनगर अमृत भारत एक्सप्रेस

6

15567/15568 बापुधाम मोतिहारी - आनंद विहार (टी) अमृत भारत एक्सप्रेस

7

22361/22362 राजेंद्रनगर (टी) - नवी दिल्ली अमृत भारत एक्सप्रेस

8

13433/13434 एसएमव्हीटी बेंगळुरू - मालदा टाउन अमृत भारत एक्सप्रेस

9

13435/13436 मालदा टाउन - गोमतीनगर अमृत भारत एक्सप्रेस

10

15133/15134 छपरा - आनंद विहार (टी) अमृत भारत एक्सप्रेस

11

14047/14048 सीतामढी - दिल्ली अमृत भारत एक्सप्रेस

12

14627/14628 सहरसा - छेहर्ता अमृत भारत एक्सप्रेस

13

19623/19624 मदार - दरभंगा अमृत भारत एक्सप्रेस

14

16601/16602 इरोड - जोगबनी अमृत भारत एक्सप्रेस

15

19021/19022 उधना - ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस

16

15671/15672 कामाख्या - रोहतक अमृत भारत एक्सप्रेस

17

20609/20610 न्यू जलपाईगुडी - तिरुच्छिरापल्ली अमृत भारत एक्सप्रेस

18

16597/16598 एसएमव्हीटी बेंगळुरू - अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस

19

11031/11032 पनवेल - अलिपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस

20

16107/16108 तांबारम - संत्रागाची अमृत भारत एक्सप्रेस

21

13065/13066 हावडा - आनंद विहार (टी) अमृत भारत एक्सप्रेस

22

22587/22588 सियाल्दा - बनारस अमृत भारत एक्सप्रेस

23

20603/20604 न्यू जलपाईगुडी - नागरकोइल अमृत भारत एक्सप्रेस

24

15949/15950 दिब्रुगड - गोमती नगर अमृत भारत एक्सप्रेस

25

16121/16122 तांबरम - तिरुवनंतपुरम सेंट्रल अमृत भारत एक्सप्रेस

26

16329/16330 नागरकोइल - मंगळुरु अमृत भारत एक्सप्रेस

27

17041/17042 चारलापल्ली - तिरुवनंतपुरम उत्तर अमृत भारत एक्सप्रेस

28

16619/16620 पोदनूर-धनबाद अमृत भारत एक्सप्रेस

29

16357/16358 नागरकोइल-चारलापल्ली अमृत भारत एक्सप्रेस

30

15673/15674 चारलापल्ली - कामाख्या अमृत भारत एक्सप्रेस

 

सध्या, दक्षिण रेल्वेमार्फत पुढील 14 अमृत भारत एक्सप्रेस सेवा चालवण्यात येत आहेत:

अ.क्र.

रेल्वे क्रमांक आणि नाव

1

16107 तांबरम - संत्रागाची अमृत भारत एक्सप्रेस

2

16108 संत्रागाची - तांबरम अमृत भारत एक्सप्रेस

3

16121 तांबरम - तिरुवनंतपुरम सेंट्रल अमृत भारत एक्सप्रेस

4

16122 तिरुवनंतपुरम सेंट्रल - तांबरम अमृत भारत एक्सप्रेस

5

16329 नागरकोइल - मंगळुरु जंक्शन. अमृत भारत एक्सप्रेस

6

16330 मंगळुरु जंक्शन - नागरकोइल अमृत भारत एक्सप्रेस

7

16357 नागरकोइल - चारलापल्ली अमृत भारत एक्सप्रेस

8

16358 चारलापल्ली - नागरकोइल अमृत भारत एक्सप्रेस

9

16601 इरोड - जोगबनी अमृत भारत एक्सप्रेस

10

16602 जोगबनी - इरोड अमृत भारत एक्सप्रेस

11

20603 न्यू जलपाईगुडी - नागरकोइल अमृत भारत एक्सप्रेस

12

20604 नागरकोइल - न्यू जलपाईगुडी अमृत भारत एक्सप्रेस

13

20609 न्यू जलपाईगुडी - तिरुच्छिरापल्ली अमृत भारत एक्सप्रेस

14

20610 तिरुचिरापल्ली - न्यू जलपाईगुडी अमृत भारत एक्सप्रेस

 

या सेवांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून 2025-26 दरम्यान (10.03.2026 पर्यंत) या गाड्यांमधून 100 % पेक्षा जास्त प्रवासी क्षमतेने वाहतूक केली आहे.

शिवाय, परिचालन व्यवहार्यता, वाहतुकीचे स्वरूप, सेवेचे स्वरूप इत्यादी बाबींच्या आधारे, वेळापत्रकाचे सुसूत्रीकरण ही भारतीय रेल्वेची निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

अत्यंत वेगवान आणि सुरक्षेसाठी अधिक चांगल्या सुविधा ही या गाड्यांची प्रमुख वैशिष्ट्ये असून, त्यांमध्ये पुढील वर्धित वैशिष्ट्ये आणि सुविधांचा समावेश आहे:

  • वंदे भारत स्लीपरच्या धर्तीवर, अधिक चांगली आणि सुखद प्रवासाचा अनुभव देणारी सुंदर आसने आणि बर्थची व्यवस्था.
  • धक्केमुक्त सेमी-ऑटोमॅटिक क्लचेस.
  • क्रॅश ट्यूबद्वारे डब्याचे अपघातापासून संरक्षण करण्याची वर्धित सोय.
  • सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही प्रणालीची सोय.
  • स्वच्छतागृहांची सुधारित रचना.
  • बर्थवर सहज चढता यावे यासाठी शिडीची सुधारित रचना.
  • अधिक चांगल्या दर्जाचे एलईडी लाइटिंग आणि चार्जिंग पोर्ट्स.
  • ईपी-सहाय्यित ब्रेकिंग सिस्टमची सोय
  • स्वच्छतागृहांमध्ये आणि विद्युत कक्षांमध्ये एरोसोल-आधारित अग्निशमन प्रणाली.
  • यूएसबी टाइप-ए आणि टाइप-सी मोबाइल चार्जिंग पोर्ट्स.
  • प्रवासी आणि गार्ड/ट्रेन व्यवस्थापक यांच्यातील दुतर्फा संवादासाठी आपत्कालीन टॉकबॅक प्रणाली.
  • वाढीव हिटिंग क्षमता असलेली, नॉन एसी पॅन्ट्री
  • सहज जोडणी आणि काढणीसाठी क्विक रिलीज यंत्रणा असलेले पूर्णपणे बंदिस्त गँगवे.

केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

माधुरी पांगे/मंजिरी गानू/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2245751) अभ्यागत कक्ष : 11