पंचायती राज मंत्रालय
केंद्राकडून बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी 15 व्या वित्त आयोगाचे अनुदान म्हणून 4,383 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे वितरण
Posted On:
24 MAR 2026 7:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2026
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्रातील पंचायती राज संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 15व्या वित्त आयोगांतर्गत बांधील आणि मुक्त अनुदान म्हणून 4,383.98 कोटी रुपये निधी दिला आहे. या निधीत विविध आर्थिक वर्षांमधील वाटपांचा समावेश असून ग्रामीण स्थानिक शासन अधिक बळकट करण्याचा उद्देश यामागे आहे.
बिहारमध्ये, आर्थिक वर्ष 2025–26 साठी 15व्या वित्त आयोगाच्या बांधील अनुदानाचा दुसरा हप्ता म्हणून सर्व 38 जिल्हा पंचायती, 533 ब्लॉक पंचायती आणि 8,053 ग्राम पंचायतींना 1,203.60 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. तसेच, नंतर पात्र ठरलेल्या 3 ब्लॉक पंचायती आणि 7 ग्राम पंचायतींसाठी पहिल्या हप्त्याच्या रोखून ठेवलेल्या हिश्श्यातून अतिरिक्त 2.09 कोटी रुपये निधी दिला जात आहे. त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेशातील सर्व 75 जिल्हा पंचायती, 826 ब्लॉक पंचायती आणि 57,694 ग्राम पंचायतींना दुसऱ्या हप्त्याच्या रूपात 2,339.10 कोटी रुपये निधी जारी केला आहे. याशिवाय, पहिल्या हप्त्याच्या रोखून ठेवलेल्या भागातून नव्याने पात्र ठरलेल्या 2 जिल्हा पंचायती, 13 ब्लॉक पंचायती आणि 61 ग्राम पंचायतींना अतिरिक्त 16.52 कोटी रुपये निधी जारी झाला आहे. झारखंडमधील, सर्व 24 जिल्हा पंचायती, 253 पात्र ब्लॉक पंचायती आणि 4,342 पात्र ग्राम पंचायतींना देण्याची बांधील अनुदानाची रक्कम 412.69 कोटी रुपये आहे.
महाराष्ट्रात आर्थिक वर्ष 2022–23 साठी 15व्या वित्त आयोगाच्या बांधील अनुदानाच्या पहिल्या हप्त्याच्या रोखून ठेवलेल्या भागातून अतिरिक्त पात्र ठरलेल्या 12 जिल्हा पंचायती, 125 ब्लॉक पंचायती आणि 50 ग्राम पंचायतींना 104.04 कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच, आर्थिक वर्ष 2022–23 साठी बांधील अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याच्या रोखून ठेवलेल्या भागातून 120.61 कोटी रुपये 12 जिल्हा पंचायती, 125 ब्लॉक पंचायती आणि आता पात्र ठरलेल्या 324 ग्राम पंचायतींसाठी जारी केले आहेत. दरम्यान, अनुदानाच्या मुक्त भागांतर्गत, आर्थिक वर्ष 2023–24 साठी पहिल्या हप्त्याच्या रोखून ठेवलेल्या भागातून 106.20 कोटी रुपये अतिरिक्त पात्र 12 जिल्हा पंचायती, 125 ब्लॉक पंचायती आणि 1,120 ग्राम पंचायतींसाठी देण्यात येत आहे. तसेच, मुक्त भागांतर्गत आर्थिक वर्ष 2023–24 साठी अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याच्या रोखून ठेवलेल्या भागातून 79.13 कोटी रुपये अतिरिक्त पात्र 12 जिल्हा पंचायती, 125 ब्लॉक पंचायती आणि 183 ग्राम पंचायतींना दिले आहेत.
* * *
सुषमा काणे/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2244699)
अभ्यागत कक्ष : 17