पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टी.एन. नटराजन यांनी सेल चे संचालक (वाणिज्यिक) म्हणून कार्यभार स्वीकारला

Posted On: 20 MAR 2026 9:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मार्च 2026

 

टी.एन. नटराजन यांनी 19 मार्च 2026 रोजी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) येथे संचालक (वाणिज्यिक) पदाचा कार्यभार स्वीकारला. नटराजन यांच्याकडे उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि विक्री या क्षेत्रात 32 वर्षांहून अधिक नेतृत्वाचा अनुभव आहे. 1993 मध्ये  व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून सेलमध्ये ते रुजू झाले. त्यांनी उत्पादन प्रक्रिया, पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि धोरणात्मक विपणन यांसारख्या क्षेत्रात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.

सातत्यपूर्ण वाढ आणि बाजारपेठेचा विस्तार घडवून आणण्याचा सिद्ध अनुभव त्यांच्याकडे आहे. यामध्ये प्रादेशिक विक्री वाढवणे, प्रमुख ग्राहकांशी असलेले संबंध अधिक दृढ करणे आणि पायाभूत सुविधा, फॅब्रिकेशन व तेल आणि वायू यांसारख्या उच्च-मूल्याच्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय वाढ घडवून आणणे यांचा समावेश आहे. सेलच्या विपणन दृष्टिकोनाला वस्तू-आधारित विक्रीतून उपाय -केंद्रित सहभागाकडे वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना त्यांनी अभिनव, ग्राहक-केंद्रित सेवा मॉडेल तयार केले होते.

नटराजन हे उच्च-कामगिरी करणारा चमू घडवणे, वितरण जाळे मजबूत करणे आणि धोरणात्मक उपक्रमांद्वारे ब्रँडची ओळख वाढवणे यासाठीही ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाने बाजारपेठेतील हिस्सा, नफा आणि ग्राहकांचा विश्वास वाढवण्यात सातत्याने योगदान दिले आहे.

गतिमान नेतृत्व, धोरणात्मक दृष्टिकोन आणि उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी ओळखले जाणारे नटराजन हे सेलची व्यावसायिक वृद्धी आणि दीर्घकालीन ओळख निर्माण करण्यात सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2243199) अभ्यागत कक्ष : 12
Read this releasein: English , हिन्दी