खते विभाग
युरियाच्या किमतीत कोणतीही वाढ नाही; संतुलित खतवापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गोणीचा आकार कमी करण्यात आला
Posted On:
20 MAR 2026 8:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2026
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, युरियाच्या किमतीत वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; तसेच संतुलित खतवापराला चालना देण्यासाठी आणि जमिनीचा कस सुधारण्यासाठी एक धोरणात्मक उपाय म्हणून युरियाच्या गोणीचा आकार कमी करण्यात आला आहे.
युरियाचा अतिरिक्त वापर रोखणे आणि शेतकऱ्यांना खतांचा विवेकपूर्ण व कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देणे या उद्देशाने गोणीचा आकार 50 किलोवरून 45 किलोपर्यंत आणि काही प्रकरणांमध्ये 40 किलोपर्यंत कमी करण्यात आला आहे.
सध्या, 45 किलोच्या 'नीम कोटेड युरिया'च्या गोणीची कमाल किरकोळ किंमत (एम आर पी) प्रति गोणी 242 रुपये आहे (नीम कोटिंगचे शुल्क आणि लागू कर वगळता). त्याचप्रमाणे, 'सल्फर कोटेड युरिया'ची एम आर पी 40 किलोच्या गोणीसाठी 254 रुपये आहे (केंद्र आणि राज्याचे उपकर/GST वगळता)
सरकारने यावर भर दिला आहे की, शेतकऱ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता शाश्वत कृषी पद्धती सुनिश्चित करणे हा या उपाययोजनांचा उद्देश आहे.
ही माहिती रसायन आणि खते मंत्रालयाच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2243164)
अभ्यागत कक्ष : 14