पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने नेपाळमधील निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांचे केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 09 MAR 2026 10:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मार्च 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि पार्टीचे ज्येष्ठ नेते बालेंद्र शाह यांच्याशी आज दूरध्वनीवरून सोहार्दपूर्ण संवाद साधला.

या दोन्ही नेत्यांना नेपाळमधील निवडणुकीत मिळवलेला विजय आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. आगामी नवीन सरकारसाठी पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. दोन्ही देशांची परस्पर समृद्धी, प्रगती आणि दोन देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी सोबत काम करण्याची भारताची वचनबद्धताही त्यांनी व्यक्त केली.

भारत आणि नेपाळमधील संबंधांच्या भविष्याबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला.  दोन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नांच्या माध्यमातून परस्परांमधली भागीदारी येत्या काळात नवी उंची गाठेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,

राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे ज्येष्ठ नेते बालेंद्र शाह यांच्याशी आज दूरध्वनीवरून सौहार्दपूर्ण संवाद साधला.

नेपाळमधील निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल तसेच राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले. आगामी नवीन सरकारसाठी माझ्या शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशांची परस्पर समृद्धी, प्रगती आणि कल्याणासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची भारताच्या वचनबद्धता व्यक्त केली.

परस्परांच्या संयुक्त प्रयत्नांच्या माध्यमातून येत्या काळात भारत आणि नेपाळमधील संबंध नव्या उंचीवर पोहोचतील असा मला  विश्वास आहे. 

@hamrorabi

@ShahBalen

@party_swatantra


निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2237273) आगंतुक पटल : 92
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam