कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
भारत आणि फिनलँड यांच्यातील पर्यावरणीय सहकार्य सामंजस्य कराराचे नूतनीकरण
प्रदूषण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन, चक्रीय अर्थव्यवस्था आणि हवामान कृती क्षेत्रांमध्ये भारत–फिनलँड भागीदारी कराराच्या नूतनीकरणामुळे अधिक मजबूत
Posted On:
05 MAR 2026 7:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2026
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि फिनलँडच्या हवामान व पर्यावरण मंत्री सारी मुलताला यांनी नवी दिल्ली इथे भारत आणि फिनलँड यांच्यातील पर्यावरणीय सहकार्यावरील सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले.
समाज माध्यम X वरील एका संदेशात यादव यांनी सांगितले की 2020 मध्ये स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य कराराचे भारताने नूतनीकरण केले, याचा त्यांना आनंद आहे. या नूतनीकरणामुळे ज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्याच्या माध्यमातून प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण, कचरा व्यवस्थापन, हवामान बदल, वने आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन या क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ होईल.
नूतनीकृत सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्य आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी एक संरचित चौकट पुढेही उपलब्ध राहील. यामध्ये हवेच्या व पाण्याच्या प्रदूषणाला प्रतिबंध व नियंत्रण, यामध्ये दूषित मातीवर उपाययोजनांचाही समावेश आहे, धोकादायक कचरा, कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती व पुनर्वापरासह कचरा व्यवस्थापन, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि वने यांच्या वापरात चक्रीय अर्थव्यवस्था आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल असे उपाय; हवामान बदलाच्या परिणामांवर उपाययोजना, पर्यावरण आणि वन विषयक डेटा व्यवस्थापनासह निरीक्षण, तसेच सागरी आणि किनारी साधनसंपत्तीचे संरक्षण व शाश्वत वापर आणि जलसंसाधनांचे एकात्मिक व्यवस्थापन यांचा समावेश आहे.
संवाद आणि संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी सहकार्याच्या संधींबाबत द्विपक्षीय चर्चा झाली.





शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2235701)
अभ्यागत कक्ष : 57