रेल्वे मंत्रालय
होलिकोत्सवाच्या गर्दीच्या काळात प्रवास सुखकर, वेळेत आणि त्रासमुक्त करण्यासाठी भारतीय रेल्वेची उत्सवासाठीची सर्वसमावेशक व्यवस्था जारी
उत्तर-पश्चिम रेल्वेद्वारे 5.5 दशलक्षाहून अधिक प्रवाशांचा प्रवास; फक्त 1 आणि 2 मार्च या दोन दिवशी 1.1 दशलक्ष प्रवाशांचा प्रवास
रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे पोलीस दल-आरपीएफ पथकांकडून होळीच्या प्रवासादरम्यान सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची निश्चिती; वयस्कर, दिव्यांग आणि महिला प्रवाशांना मदत
Posted On:
03 MAR 2026 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,3 मार्च 2026
रेल्वेने, देशभरात सुरू असलेल्या होलिकोत्सवानिमित्त गर्दीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत, वेळेवर आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी 2 मार्च 2026 आणि आज 3 मार्च 2026 रोजीही आपली वाढीव संचालनात्मक सज्जता जारी राखली आहे.
प्रवाशांसाठी विविध विभागां अंतर्गत विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. त्याचबरोबर प्रमुख स्थानकांवर शिस्तबद्ध रांग व्यवस्थापन, प्रवाशांना टप्प्याटप्प्याने गाडीत चढवणे आणि गर्दीचे प्रभावी नियंत्रण यांसारख्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. आरपीएफ पथके आणि 'रेल्वे कर्मयोगीं' (प्रत्यक्ष कार्यरत कर्मचारी) सह रेल्वे कर्मचारी सतत सतर्क राहून जातीने लक्ष ठेवत आहेत. ते वयस्कर, दिव्यांग आणि महिला प्रवाशांना मदत करत असून संपूर्ण प्रवासात आवश्यक मार्गदर्शनही पुरवत आहेत. गर्दीवर नियंत्रणासाठी आणि प्रवाशांना आधार देण्यासाठी मोठ्या स्थानकांवर नागरी संरक्षण (सिव्हील डिफेन्स) स्वयंसेवक देखील तैनात करण्यात आले आहेत. होळीच्या काळात प्रवास करणारे प्रवासी, स्वच्छता, उपलब्ध सुविधा आणि कार्यक्षम तिकीट प्रणालीचे कौतुक करत आहेत. हे कौतुक, सुविधा, सुरक्षितता आणि संघटीत प्रवासाचा अनुभव, यावर रेल्वे देत असलेला भर अधोरेखित करते.
उत्तर-पश्चिम रेल्वेअंतर्गत येणाऱ्या स्थानकांवरून 5.5 दशलक्षाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून फक्त 1 आणि 2 मार्च या दोन दिवशी 1.1 दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला. या काळात विशेष गाड्यांच्या 21 फेऱ्या चालविण्यात आल्या.
होळी सणादरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी प्रभावीपणे हाताळण्यासाठी उत्तर पश्चिम रेल्वेने सर्वसमावेशक आणि सुयोग्य समन्वय साधत व्यापक व्यवस्था केली. झोनमधील आपल्या गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि त्रासमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधला.
होळीच्या निमित्ताने, मध्य रेल्वेने (ट्रेन क्रमांक 12173) लोकमान्य टिळक टर्मिनस-उद्योग नगरी एक्सप्रेससाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे अतिरिक्त सणासुदीची गर्दी लक्षात घेऊन शिस्तबद्ध रांगा आणि प्रभावी गर्दी व्यवस्थापनाची अंमलबजावणी केली. यामुळे प्रवाशांनी आपला प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी पद्धतीने सुरू केला
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे संपूर्ण होळीच्या हंगामात प्रभावी गर्दी नियंत्रण उपाययोजना राबविल्या जात आहेत, ज्यामुळे उत्सवी गर्दी नियंत्रित राहते आणि प्रवाशांचा ओघ सुरळीत आणि सुव्यवस्थित राहतो.
आनंद विहार टर्मिनल येथून होळी विशेष ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि सुरळीत प्रवासासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
विशेष गाड्या सुरू झाल्यामुळे, होळीच्या काळात गावी जाणे अधिक सोपे आणि आरामदायी झाले आहे. गोरखपूर येथील बी.आर.डी. वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याने होळी विशेष ट्रेनने प्रवास करताना रेल्वे प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले आणि सुखद प्रवास अनुभवाचे कौतुक केले.
निलीमा चितळे/आशुतोष सावे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2235199)
अभ्यागत कक्ष : 57