दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या तिमाही साठी, 'भारतीय दूरसंचार सेवा कामगिरी दर्शक अहवाल'

Posted On: 03 MAR 2026 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,3 मार्च 2026

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण-ट्रायने (टी आर ए आय- टेलिकॉम रेगुलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया) 31 डिसेंबर 2025 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी 'भारतीय दूरसंचार सेवा कामगिरी दर्शक अहवाल' आज प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल भारतातील दूरसंचार सेवांचा विस्तृत दृष्टीकोन मांडतो. यामध्ये मुख्यत्वे सेवा पुरवठादारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, 1 ऑक्टोबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीतील दूरसंचार सेवांसह केबल टीव्ही, डीटीएच आणि रेडिओ प्रसारण सेवांचे महत्त्वाचे निकष आणि वाढीचा कल दर्शवण्यात आला आहे.

या अहवालाचा संक्षिप्त कार्यकारी आढावा सोबत जोडला आहे. संपूर्ण अहवाल, ट्रायच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.trai.gov.in) आणि (http://www. trai.gov.in/release-publication/reports/performance-indicators-reports) या दुव्यावर (लिंक) उपलब्ध आहे. या अहवालाबाबत काही सूचना किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास, ट्रायचे सल्लागार (एफ आणि ई ए) विजय कुमार यांच्याशी दूरध्वनी क्र. +91-20907773 किंवा fea1-div@trai.gov.in या ईमेलवर संपर्क साधता येईल.

भारतीय दूरसंचार सेवा कामगिरी दर्शक

(ऑक्टोबर-डिसेंबर, 2025)

संक्षिप्त कार्यकारी आढावा

इंटरनेट (जागतिक संगणकीय जाळे) ग्राहकांची एकूण संख्या सप्टेंबर-25 अखेर 1017.81 दशलक्ष होती, ती डिसेंबर-25 अखेर 1028.61 दशलक्ष झाली असून यात 1.06 % ची तिमाही वाढ नोंदवण्यात आली आहे. या 1028.61 दशलक्ष ग्राहकांपैकी 'वायर्ड' (तारयुक्त) इंटरनेट ग्राहकांची संख्या 45.32 दशलक्ष, तर 'वायरलेस' (बिनतारी) इंटरनेट ग्राहकांची संख्या 983.29 दशलक्ष आहे.

इंटरनेट ग्राहकांची संरचना

एकूण इंटरनेट ग्राहकांमध्ये 1007.35 दशलक्ष ब्रॉडबँड ग्राहक आणि 21.25 दशलक्ष नॅरोबँड ग्राहकांचा समावेश आहे.

ब्रॉडबँड इंटरनेट ग्राहकांच्या (वर्गणीदार) संख्येत 1.18 % ची वाढ झाली असून ही संख्या सप्टेंबर-25 अखेरीच्या 995.63 दशलक्ष  वरून, डिसेंबर-25 अखेरीस 1007.35 दशलक्ष  झाली आहे. याउलट, याच कालावधीत नॅरोबँड इंटरनेट ग्राहकांची संख्या 4.18 % ने घटली असून ती 22.18 दशलक्ष वरून 21.25 दशलक्ष झाली आहे.

वायरलाईन ग्राहकांची संख्या सप्टेंबर-25 अखेर 46.61 दशलक्ष होती, ती डिसेंबर-25 अखेर 1.62 % च्या तिमाही वाढीसह 47.37 दशलक्ष झाली आहे. वार्षिक (Y-O-Y) आधारावर (मागील वर्षाच्या त्याच कालावधीशी तुलना) विचार केल्यास, वायरलाईन वर्गणीदारांच्या संख्येत 20.63 % ची वाढ झाली आहे.

वायरलाईन टेलि-डेन्सिटी (दूरध्वनी घनता) म्हणजेच दर 100 लोकांमागे असलेल्या स्थिर (लँडलाईन) दूरध्वनी जोडण्यांची संख्या, 3.29 % वरून वाढून 3.33 % झाली असून यात 1.23 % चा तिमाही वृद्धी दर दिसून आला आहे.

वायरलेस सेवेसाठी प्रति वापरकर्ता सरासरी मासिक महसूल (ए आर पी यू- एव्हरेज रेव्हेन्यू पर यूजर) 1.87 % ने वाढला आहे. सप्टेंबर तिमाहीतील 190.99 रुपयांवरून हा महसूल डिसेंबर तिमाहीत 194.57 रुपये झाला आहे. Y-O-Y आधारावर यामध्ये 7.03 % ची वाढ झाली आहे.

डिसेंबर-25 च्या तिमाहीत पूर्व-देय  (प्री-पेड) विभागासाठी प्रति महिना प्रति ग्राहक ए आर पी यू 194.12 रुपये असून, उत्तर-देय  (पोस्ट-पेड) विभागासाठी तो 199.05 रुपये इतका आहे.

अखिल भारतीय सरासरीनुसार, प्रति महिना मिनिटांचा वापर (एम ओ यू- मिनिट्स ऑफ युसेज) 0.72 % ने वाढला असून तो 1005  वरून 1012 मिनिटे झाला आहे.

डिसेंबर-25 तिमाहीत प्री-पेड ग्राहकांचा प्रति महिना वापर 1064 मिनिटे, तर पोस्ट-पेड ग्राहकांचा 501 मिनिटे इतका आहे.

डिसेंबर-25 च्या तिमाहीत दूरसंचार सेवा क्षेत्राचा एकूण महसूल  1,02,475 कोटी रुपये, लागू एकूण महसूल (ॲप्लिकेबल ग्रॉस रेव्हेन्यू -एपीजीआर) 96,456 कोटी रुपये आणि समायोजित एकूण  महसूल (ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू-ए जी आर) 84,270 कोटी रुपये इतका राहिला आहे.

समायोजित सकल महसुलाची सेवानिहाय रचना

सप्टेंबर 2025 अखेर भारतातील एकूण दूरध्वनी ग्राहकांची संख्या 1,228.94 दशलक्ष  होती , जी डिसेंबर-2025 अखेर 1,306.14 दशलक्ष  झाली असून मागील तिमाहीच्या तुलनेत 6.28% वाढ नोंदवली गेली.

भारतातील दूरध्वनी ग्राहक आणि टेलि-घनतेतील ट्रेंड

शहरी भागातील दूरध्वनी ग्राहकांची संख्या सप्टेंबर 2025 अखेर 68.911 कोटी होती, ती डिसेंबर 2025 अखेर 76.244 कोटी झाली. त्याच कालावधीत शहरी टेलि-घनता देखील 134.76 % वरून 148.92% पर्यंत वाढली.

ग्रामीण भागातील दूरध्वनी ग्राहक संख्या सप्टेंबर 2025 अखेर 53.983 कोटी होती, ती डिसेंबर 2025 अखेर 54.370 कोटी झाली. ग्रामीण टेलि घनता देखील याच कालावधीत 59.52% वरून 59.63% पर्यंत वाढली.

एकूण सदस्यत्वांपैकी, ग्रामीण सदस्यत्वाचा वाटा सप्टेंबर 2025 अखेर 43.93% होता, तो डिसेंबर 2025 अखेर 41.63% पर्यंत कमी झाला.

दूरध्वनी ग्राहकसंख्येची रचना

तिमाहीत 764.5 लाख निव्वळ वाढीसह, एकूण वायरलेस (मोबाइल + एफडब्ल्यूए) ग्राहकांची संख्या सप्टेंबर 2025 अखेर 11823.2 लाखावरून डिसेंबर 2025 अखेर 12857.7 लाख झाली असून मागील तिमाहीच्या तुलनेत 6.47% वाढ नोंदवण्यात आली.

वायरलेस (मोबाइल + एफडब्ल्यूए) टेलि-घनता सप्टेंबर 2025 अखेर 83.36% होती, ती डिसेंबर 2025 अखेर 88.41% झाली असून तिमाही वाढीचा दर 6.05% होता.

या तिमाहीत 737.6 लाख ग्राहकांच्या निव्वळ वाढीसह, वायरलेस (मोबाइल) ग्राहकांची संख्या सप्टेंबर 2025 अखेर 11704.4 लाखावरून डिसेंबर 2025 अखेर 12442.0 लाख झाली असून मागील तिमाहीच्या तुलनेत 6.30% वाढ नोंदवण्यात आली.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केवळ अपलिंकिंग/केवळ डाउनलिंकिंग/अपलिंकिंग आणि डाउनलिंकिंग दोन्हीसाठी एकूण 920 खाजगी उपग्रह टीव्ही वाहिन्यांना परवानगी दिली आहे.

सार्वजनिक प्रसारक असलेल्या ऑल इंडिया रेडिओद्वारे चालवल्या जाणाऱ्या रेडिओ वाहिन्यांव्यतिरिक्त, एफएम रेडिओ ऑपरेटर्सनी ट्रायला दिलेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबर 2025 रोजी 31 खाजगी एफएम रेडिओ ऑपरेटर्सद्वारे 113 शहरांमध्ये चालवल्या जाणाऱ्या 387 कार्यरत खाजगी एफएम रेडिओ वाहिन्या होत्या.

31 डिसेंबर 2025 रोजी संपलेल्या तिमाहीत 385 खाजगी एफएम रेडिओ वाहिन्यांच्या संदर्भात एफएम रेडिओ ऑपरेटर्सनी नोंदवलेला जाहिरातींचा महसूल 419.29 कोटी रुपये आहे, जो मागील तिमाहीत म्हणजेच 30 सप्टेंबर 2025 मध्ये 387 खाजगी एफएम रेडिओ चॅनेल्सच्या संदर्भात 399.96 कोटी रुपये होता.

31 डिसेंबर 2025 पर्यंत 557 सामुदायिक रेडिओ केंद्र कार्यरत आहेत. 

SNAPSHOT

 

(Data as on Q.E. 31st December 2025)

Telecom Subscribers (Wireless+Wireline)

Total Subscribers

1,306.14 million

% change over the previous quarter

6.28%*

Urban Subscribers

762.44 million

Rural Subscribers

543.70 million

Market share of Private Operators

92.17%

Market share of PSU Operators

7.83%

Tele-density

91.74%

Urban Tele-density

148.92%

Rural Tele-density

59.63%

Wireless (Mobile+FWA) Subscribers

Wireless (Mobile) Subscribers

1,244.20 million

Wireless (5G FWA+UBR FWA) Subscribers

14.57 million

Total Wireless Subscribers

1,258.77 million

% change over the previous quarter

6.47%*

Urban Subscribers

720.15 million

Rural Subscribers

538.62 million

Market share of Private Operators

92.61%

Market share of PSU Operators

7.39%

Tele-density

88.41%

Urban Tele-density

140.66%

Rural Tele-density

59.07%

Total Wireless Data Usage during the quarter

73,324 PB

Number of Public Mobile Radio Trunk Services (PMRTS)

65,515

Number of Very Small Aperture Terminals (VSAT)

2,09,683

Wireline Subscribers

Total Wireline Subscribers

47.37 million

% change over the previous quarter

1.62%

Urban Subscribers

42.29 million

Rural Subscribers

5.08 million

Market share of PSU Operators

19.70%

Market share of Private Operators

80.30%

Tele-density

3.33%

Rural Tele-density

0.56%

Urban Tele-density

8.26%

No. of Public Call Office (PCO)

4,937

Telecom Financial Data

Gross Revenue (GR) during the quarter

Rs. 1,02,475 crore

% change in GR over the previous quarter

2.65%

Applicable Gross Revenue (ApGR) during quarter

Rs. 96,456 crore

% change in ApGR over the previous quarter

2.28%

Adjusted Gross Revenue (AGR) during the quarter

Rs. 84,270 crore

% change in AGR over the previous quarter

2.33%

Share of Public sector undertakings in Access AGR

2.87%

Internet/Broadband Subscribers

Total Internet Subscribers

1028.61 million

% change over previous quarter

1.06%

Narrowband subscribers

21.25 million

Broadband subscribers

1007.35 million

Fixed (Wired) Access Internet Subscribers

45.32 million

Wireless (Fixed+Mobile) Access Internet Subscribers

983.29 million

Urban Internet Subscribers

594.33 million

Rural Internet Subscribers

434.27 million

Total Internet Subscribers per 100 population

72.24%

Urban Internet Subscribers per 100 population

116.09%

Rural Internet Subscribers per 100 population

47.63%

Total Outgoing Minutes of Usage for Internet Telephony

68.08 million

No. of Public Wi-Fi Hotspots

55,483

Aggregate Data Consumed (TB) for Wi-Fi Hotspots

11,805 TB

Broadcasting & Cable Services

Number of private satellite TV channels permitted by the Ministry of I&B for uplinking only/downlinking only/both uplinking and downlinking

920

Number of Pay TV Channels as reported by broadcasters

335

Number of private FM Radio Channels (excluding All India Radio)

385

Number of total active subscribers with pay DTH operators

50.99 million

Number of Operational Community Radio Stations

557

Number of pay DTH Operators

4

Revenue & Usage Parameters

**Monthly ARPU of Wireless Service

Rs.194.57

Minutes of Usage (MOU) per subscriber per month - Wireless Service

1012

Wireless Data Usage

Average Wireless Data Usage per wireless data subscriber per month

25.70 GB

Average revenue realization per GB for wireless data usage during the quarter

Rs.7.87

Note: *Till the month of November 2025, M/S Bharti Airtel Limited was not including their M2M cellular subscriber base in their wireless (Mobile) subscriber base while the remaining operators were including their M2M cellular subscriber base in their wireless (Mobile) subscriber base. From this month of December 2025, M/S Bharti Airtel Limited has started including their M2M cellular subscriber base in their wireless (mobile) subscriber base. As a result, there has been a significant increase in the Total and wireless (mobile) subscriber base in the month of December 2025.


निलीमा चितळे/आशुतोष सावे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2235189) अभ्यागत कक्ष : 65
Read this releasein: English , हिन्दी