संसदीय कामकाज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संसदीय कार्य मंत्रालयाने ‘सेवा संकल्प ठरावा’वर घेतली बैठक; 'हक्काच्या भावने'कडून 'सेवेच्या भावने'कडे वळण्याचे सचिवांचे आवाहन

Posted On: 03 MAR 2026 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मार्च 2026

"सेवा तीर्थ" येथील पहिल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारलेल्या “सेवा संकल्प ठरावा”च्या अनुषंगाने, संसदीय कार्य मंत्रालयाने (एम ओ पी ए) 02 मार्च 2026 रोजी सचिवांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती.

बैठकीच्या सुरुवातीला “सेवा संकल्प ठराव” वाचून दाखवण्यात आला. त्यानंतर या ठरावातील मार्गदर्शक तत्त्वे आणि मंत्रालयाच्या अधिकारक्षेत्रानुसार त्यांची अंमलबजावणी कशी करता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

अधिकाऱ्यांना संबोधित करताना सचिवांनी सार्वजनिक प्रशासनामध्ये "हक्काची भावना" सोडून "सेवेची भावना" जोपासण्याच्या गरजेवर भर दिला. प्रत्येक निर्णय आणि कृतीच्या केंद्रस्थानी नागरिक असले पाहिजेत आणि शासन हे समर्पण, सचोटी आणि तत्परतेने चालवले गेले पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.

सचिवांनी पुढे, अधिकृत कर्तव्ये 'श्रद्धा भावाने' (प्रामाणिकपणा आणि निष्ठेची भावना) पार पाडण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि एक चिरंतन संस्थात्मक वारसा निर्माण होईल अशा पद्धतीने काम करण्यास,  अधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले.

'विकसित भारत' हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने गेल्या 12 वर्षांत विविध क्षेत्रांत झालेल्या प्रगतीवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच, विविध सरकारी विभागांमध्ये सुरू असलेल्या रचनात्मक बदलांवर आणि सुधारणांवरही विचारमंथन करण्यात आले.

या चर्चेचा मुख्य ओढा पारदर्शकत्व, उत्तरदायित्व, कामाचा वेळेत निपटारा आणि संसदीय तसेच प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना प्रभावी समन्वय मजबूत करण्यावर होता.

ठरावामध्ये अभिप्रेत असलेल्या 'विकसित भारत'चे ध्येय गाठण्यासाठी 'सेवा' आणि 'नागरिक-केंद्रित प्रशासन' या मूल्यांचे जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा अधिकाऱ्यांनी पुनरुच्चार केला.

निलीमा चितळे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2235092) अभ्यागत कक्ष : 12