नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘सिव्हिल एन्क्लेव्ह’ च्या मोठ्या विस्ताराला मंत्रिमंडळाने दिली मान्यता

प्रविष्टि तिथि: 24 FEB 2026 10:11PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारांविषयक मंत्रिमंडळ समितीने आज श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘सिव्हिल एन्क्लेव्ह’ च्या विस्तार - विकासाला मान्यता दिली. या कार्यासाठी  सुमारे  खर्च 1,677  कोटी रुपये खर्च अपेक्षित  आहे. काश्मीर खोऱ्यात हवाई  वाहतुकीची  पायाभूत सुविधा आणि संपर्क यंत्रणा  मजबूत करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.  या प्रकल्पात सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी बॅरेक्स बांधण्याचाही समावेश आहे. भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) बडगाम हवाई तळाअंतर्गत  भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे या विमानतळाचे कार्यान्वयन केले जाते.  वर्ष 2005  मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून सुविधा उपलब्ध करून  दिलेले हे  विमानतळ, श्रीनगर शहरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे.

या विमानतळाच्या परिसरामध्‍ये 73.18  एकर क्षेत्रामध्‍ये  विस्तारलेल्या या नवीन ‘सिव्हिल एन्क्लेव्ह’ प्रकल्पात 71,500  चौरस मीटर (20,659 चौरस मीटर विद्यमान रचनेसह)  क्षेत्रामध्‍ये  एक अत्याधुनिक टर्मिनल वास्तू उभारण्‍यात येणार आहे.   गर्दीच्या वेळी 2,900  प्रवाशांना सेवा देण्याइतकी प्रशस्त असणार असून सर्व सुविधांनी युक्त असेल. वार्षिक 10 दशलक्ष  प्रवाशांची क्षमता या इमारतीची असेल. विस्तारित भागामध्ये 15 विमान ‘पार्किंग बे’ असतील, तसेच  एक रुंद बॉडी (कोड ई) (9 विद्यमान आणि 6 प्रस्तावित) समाविष्ट आहे, तर 3,658  मीटर लांब x 45  मीटर रूंद धावपट्टी आयएएफद्वारे चालवली जात आहे. या प्रकल्पामध्‍ये 1 हजार  गाड्यांसाठी बहु-स्तरीय कार पार्किंग सुविधेचे बांधकाम देखील समाविष्ट असणार आहे.

नवीन टर्मिनल स्थापत्यदृष्ट्या,  आधुनिक डिझाइन आणि काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे सुसंवादी मिश्रण प्रतिबिंबित करेल.  त्यामध्ये सुव्यवस्थित प्रवासी प्रक्रिया क्षेत्रे, प्रशस्त लाउंज आणि प्रगत सुरक्षा आणि चेक-इन सुविधांद्वारे कार्यान्वयन  कार्यक्षमता राखताना भिंतीवर कोरीव लाकूडकाम आणि स्थानिक कलांमधून प्रेरणादायक  कारागिरी  करून  पारंपरिक घटकांचा समावेश त्यामध्‍ये असेल.

शाश्वतता हा विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे, यामध्‍ये  प्रगत जलसंधारण प्रणाली, ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाशयोजना आणि कार्बन पदचिन्हे  कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर मिळवलेल्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश असणार आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रतिष्ठित 5-तारांकित दर्जा मिळवणे आहे.

पायाभूत सुविधांच्या वाढीव्यतिरिक्त, या प्रकल्पामुळे दल सरोवर, शंकराचार्य मंदिर आणि मुघल गार्डन्ससह प्रतिष्ठित आकर्षणांशी संपर्क व्यवस्थेत  सुधारणा होवून पर्यटन आणि आर्थिक वाढीला लक्षणीय चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. तसेच यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि  गुंतवणुकीला चालना मिळेल आणि श्रीनगरचे एक प्रमुख पर्यटन आणि आर्थिक स्थळ म्हणून स्थान मजबूत होईल. अशा प्रकारे ‘सिव्हिल एन्क्लेव्ह’चा विकास करताना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा आणि वाढीव संपर्क यंत्रणा  प्रदान करण्याच्या दिशेने एक परिवर्तनकारी पाऊल ठरणार आहे.  तसेच काश्मीरचे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वैभव जगासमोर प्रदर्शित केले जाईल.

 

शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2232475) आगंतुक पटल : 53
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Malayalam