आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे 25-28 फेब्रुवारी 2026 दरम्यान राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 चे आयोजन


राष्ट्रपतींच्या हस्ते होणार शेगाव इथल्या राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 चे उद्घाटन

औषधी वनस्पतींच्या लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि आरोग्य सेवांच्या प्रसाराचे एकात्मिकरण घडवून आणणारा चार दिवसीय भव्य कार्यक्रम

प्रविष्टि तिथि: 24 FEB 2026 7:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2026

महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे उद्या दि. 25 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत चार दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद काँग्रेस यांनी संयुक्तपणे या मेळाव्याचे आयोजन केले आहे.

शेगाव इथल्या संत गजानन महाराज संस्थानच्या विसावा मैदानावर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या 25 फेब्रुवारी 2026 रोजी या मेळाव्याचे उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आयुष आधारित प्रतिबंधात्मक आणि संवर्धनात्मक आरोग्य सेवांच्या उपलब्धतेचा विस्तार विस्तार करता यावा या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला आहे. त्याअनुषंगाने एका मोठ्या सार्वजनिक प्रचार प्रसार विषयक उपक्रमाच्या स्वरूपात या मेळाव्याची आखणी केली गेली आहे. या मेळाव्याला भेट देणाऱ्या नागरिकांना  आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी या वैद्यकीय पद्धतींअंतर्गतचे  मोफत सल्लासमसल, आरोग्य तपासणी आणि औषधोपचारांची सोय उपलब्ध करून दिली जाईल. या कार्यक्रमात योगासनांची प्रात्यक्षिके, तज्ञांची व्याख्याने, उपचार पद्धतींचे प्रदर्शन मांडले जाईल. यासोबतच नामांकित आयुष संस्था तसेच संबंधित उद्योग क्षेत्रातील भागधारकांचे प्रदर्शनही इथे असणार आहे.

बुलढाणा जिल्हा आणि संपूर्ण विदर्भ क्षेत्रातील शेतकऱ्यांसोबत विशेष संवाद घडवून आणणे हा या मेळाव्याचा एक मुख्य भाग असणार आहे. त्याअनुषंगाने विसावा संकुलात 27 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3.00 वाजता आयुर्वेदिक शेती : उत्पादन, मूल्यवर्धन आणि विपणन या विषयावर एका विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींची लागवड, कृषी वन पद्धती, पिक काढणी नंतरचे व्यवस्थापन आणि बाजारपेठेशी जोडणी याबद्दलची तांत्रिक माहिती पुरवली जाणार आहे.

शेतकऱ्यांना औषधी पिकांच्या लागवडीद्वारे उत्पन्नाचा एक शाश्वत मार्ग म्हणून, पीक वैविध्यकरणासाठी प्रोत्साहन देणे आणि आयुष क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या गुणवत्तापूर्ण कच्च्या मालाच्या पुरवठा साखळीला बळकटी देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

शेतकरी, स्वयं सहायता गट आणि युवा वर्गाने या कार्यक्रमात सक्रियपणे या उपक्रमात सहभागी व्हावे, आणि पारंपरिक शेतीसोबतच औषधी वनस्पतींवर आधारित शेतीमधील संधीही चाचपडून पाहाव्यात असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 हा आरोग्य सेवा, ज्ञानाचा प्रसार आणि ग्रामीण उपजीविकेमधील वृद्धीसाठीचे एक एकात्मिक व्यासपीठ म्हणून उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमामुळे सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक विकासाममधील आयुष व्यवस्थेची भूमिका अधिक दृढ होणार आहे.

महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमधील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांनी मोठ्या संख्येने या चार दिवसीय उपक्रमात सहभागी व्हावे, आणि या उपक्रमाअंतर्गतच्या सेवा तसेच कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2232345) आगंतुक पटल : 228
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil