अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज चिंतन शिबिराच्या औपचारिक उद्घाटनादरम्यान 'निगरानी' अ‍ॅप, हज रिस्ट बँड आणि मंत्रालयाच्या एआय चॅटबॉट्सचा केला शुभारंभ

Posted On: 19 FEB 2026 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026

अल्पसंख्याक कल्याण आणि सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणाच्या धोरणांवरील आराखड्यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय आणि राज्यातील मंत्री,वरिष्ठ अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ञांना एकत्र आणून अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने बिहारच्या राजगीर येथील नालंदा विद्यापीठात दोन दिवसांच्या राष्ट्रीय 'चिंतन शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री  किरेन रिजिजू यांनी पायाभूत सुविधांमधील तफावत भरून काढण्यासाठी PMJVK योजनेअंतर्गत 'निगरानी' (NIGRANI) अ‍ॅपचा शुभारंभ  केला.  तसेच त्यांनी यावेळी  ‘हज रिस्ट बँड’ आणि  आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या  एआय ‘चॅटबॉट्स’चा  यांचा देखील शुभारंभ केला.

नालंदा विद्यापीठात चिंतन शिबिर आयोजित केल्याबद्दल  रिजिजू यांनी मंत्रालयाच्या चमूचे अभिनंदन केले. “नालंदा हे भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या वारशाचे प्रतीक आहे आणि एक प्रमुख उत्कृष्टता केंद्र आहे,” असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

चिंतन शिबिरातील चर्चा‌ हा उपक्रम केंद्र-राज्यांचा  समन्वय साधून, भागधारकांचा सहभाग सुलभ करण्यात आणि तळागाळापर्यंत यशस्वी अंमलबजावणी करण्यास मदत करेल, असे केंद्रीय मंत्र्यांनी पुढे नमूद केले.

अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी सहभागींना संबोधित करताना सांगितले, की पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी पीएमजेव्हीके योजना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामुळे देशभरातील अल्पसंख्याक क्षेत्रांच्या पायाभूत सुविधांच्या विकासात मदत झाली आहे. पीएमविकास, एनएमडीएफसी, उमेद  सेंट्रल पोर्टल आणि मंत्रालयाचे हज उपक्रम अल्पसंख्याक कल्याण आणि विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

सोनाली काकडे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2230543) अभ्यागत कक्ष : 7
Read this releasein: English , Urdu , Malayalam