परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
सामान्य पासपोर्ट अर्जदारांसाठी पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) येथे विशेष पासपोर्ट मोहीम
Posted On:
18 FEB 2026 7:59PM by PIB Mumbai
पुणे, 18 फेब्रुवारी 2026
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (आरपीओ), पुणे केवळ सामान्य श्रेणीतील पासपोर्ट अर्जदारांसाठी विशेष पासपोर्ट मोहीम आयोजित करत आहे. ही मोहीम शनिवार, 21 फेब्रुवारी 2026 रोजी आरपीओ पुणेच्या अखत्यारीतील खालील पासपोर्ट सेवा केंद्र आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये आयोजित केली जाईल:
1. परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे जेणेकरून पासपोर्ट अपॉइंटमेंट लवकरच्या तारखेला उपलब्ध होतील आणि खालील पासपोर्ट सेवा केंद्र आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रात पासपोर्ट सेवांचे वितरण आणखी सुधारेल.
- पीएसके सोलापूर
- पीओपीएसके पिंपरी-चिंचवड
- पीओपीएसके कोल्हापूर
सामान्य पासपोर्ट श्रेणीअंतर्गत अर्जदारांनी पासपोर्ट नियमांनुसार संपूर्ण व अचूक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अर्जदारांनी ‘Passport India’ संकेतस्थळावरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे आणि अपॉइंटमेंटच्या दिवशी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व पात्रता सुनिश्चित करावी. अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
[अर्जदाराची सत्यता तपासण्यासाठी, पासपोर्ट कायदा 1967 च्या कलम 5 आणि पासपोर्ट नियम 1980 च्या नियम 5 मध्ये असे नमूद केले आहे की पासपोर्ट प्राधिकरण अशी सर्व चौकशी करू शकते आणि अर्ज निकाली काढण्यासाठी पासपोर्ट प्राधिकरणाला आवश्यक वाटेल अशी अतिरिक्त माहिती, कागदपत्रे सादर करण्याची गरज भासू शकते.]
विशेष मोहिमे अंतर्गत सामान्य अपॉइंटमेंट कशी बुक करावी :
- पासपोर्ट इंडिया वेबसाइट (https://www.passportindia.gov.in) किंवा mPassport सेवा ॲपला भेट द्या आणि सामान्य योजनेअंतर्गत अर्ज दाखल करा.
- ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर, 'शेड्यूल अपॉइंटमेंट' या पेजवर जा, पसंतीचे PSK/POPSK स्थान निवडा आणि अधिसूचित केलेल्या विशेष मोहीम तारखेसाठी अपॉइंटमेंट बुक करा.
टीप: ही मोहीम केवळ सामान्य पासपोर्ट श्रेणीच्या अपॉइंटमेंटसाठी आहे. तात्काळ श्रेणीचे अर्ज आणि वॉक-इन अर्जदारांना परवानगी दिली जाणार नाही.
विशेष मोहिमेची तारीख आणि स्थान तपशील:
- तारीख: 21 फेब्रुवारी 2026 (शनिवार)
- स्थान: पासपोर्ट सेवा केंद्र, सोलापूर, पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र, पिंपरी-चिंचवड, पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र, कोल्हापूर
- श्रेणी : केवळ सामान्य पासपोर्ट अपॉइंटमेंट (नवीन आणि पुनर्निर्गमित)
- वेळ: 09:00 ते 17:00 (अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज पावतीवर नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या नियोजित अपॉइंटमेंट वेळेच्या 15 मिनिटे आधी उपस्थित रहावे)
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229969)
अभ्यागत कक्ष : 20