आयुष मंत्रालय
सीसीआरयुएम ( केंद्रीय युनानी औषध संशोधन परिषद) आयोजित 'युनानी पद्धतीतील नवोन्मेष आणि साधार पुरावा' या विषयावरील राष्ट्रीय परिषद मुंबईत संपन्न
Posted On:
15 FEB 2026 8:13PM by PIB Mumbai
मुबंईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात आज, युनानी दिन 2026 चा भव्य समारंभ समारोप 'युनानी पद्धतीतील नवोन्मेष आणि आधार' या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोपाने पार पडला. या परिषदेत, देशभरातील प्रख्यात विद्वान, धोरणकर्ते, संशोधक, उद्योग प्रतिनिधी, व्यावसायिक आणि देशभरातून अनेक विद्यार्थी यांनी एकत्रित येत साधार पुरावा आधारित आरोग्यसेवेच्या युगात युनानी औषधोपचाराच्या भविष्यातील पथदर्शी आराखड्यावर चर्चा केली.
14 फेब्रुवारी 2026 रोजी युनानी दिन, युनानी औषध प्रणालीच्या समृद्ध वारसा आणि योगदानाचे स्मरण करून साजरा करण्यात आला. समारोपाच्य दिवशी वैज्ञानिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्याचे उद्घाटन केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी,मंत्र्यांच्या हस्ते ऐतिहासिक जे. जे. रुग्णालय परिसरात प्रादेशिक युनानी औषधोपचार संशोधन संस्थेच्या नूतनीकरण केलेल्या सह-स्थान केंद्राचे उद्घाटनही केले. त्यामुळे चिकित्सा, संशोधन आणि रुग्णसेवा पायाभूत सुविधा बळकट झाल्या आहेत.
समारोप सत्राला, राष्ट्रीय भारतीय औषध प्रणाली आयोगाच्या (एनसीआयएसएम) युनानी, सिद्ध आणि सोवा-रिगपा (बीयुएसएस) मंडळाचे अध्यक्ष प्रा. असीम अली खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात, युनानी औषधांबाबत शैक्षणिक मानके बळकट करण्याची गरज, वैज्ञानिक प्रमाणीकरण वृद्धिंगत करणे आणि युनानी औषधांना जागतिक मान्यता आणि मुख्य प्रवाहातील एकात्मता सुनिश्चित करण्यासाठी नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे यांवर भर दिला.
कार्यक्रमातील मुख्य मुद्दे-
1 आंतरराष्ट्रीय आणि 8 राष्ट्रीय सामंजस्य करारांची देवाणघेवाण.
सीसीआरयूएम प्रकाशने आणि परिषदेच्या स्मरणिका यांचे प्रकाशन.
सीसीआययूरएम सहयोग स्वारस्य अभिव्यक्ती (ईओआय) संकेतस्थळ आणि मोबाईल अॅप्लिकेशनचा शुभारंभ
मिजाझ इन्सा च्या मूल्यांकनासाठी प्रश्नावलीचे सादरीकरण
मुंबईतील आरआरआययुएम प्रयोगशाळेला एनएबीएल प्रमाणपत्र प्रदान
उत्कृष्ट संशोधन निबंध आणि संस्थांना गौरव प्रमाणपत्रे प्रदान
या चर्चेत, आयुष मंत्रालयाच्या एकात्मिक आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवेच्या दृष्टीकोनाशी सुसंगत युनानी औषधोपचारांचे भविष्य बळकट करण्यासाठी नवोपक्रम, वैज्ञानिक मूल्ये, डिजीटल एकात्मता आणि जागतिक सहकार्य हे आवश्यक आधारस्तंभ आहेत, यावर पुन्हा एकदा भर देण्यात आला.




***
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2228494)
अभ्यागत कक्ष : 6