ऊर्जा मंत्रालय
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये क्षमता वर्धनाने 50,000 मेगावॉट चा टप्पा ओलांडला (जानेवारी 2026 पर्यंत). अवघ्या 10 महिन्यांत एकूण स्थापित क्षमतेत 11% पेक्षा जास्त भर
Posted On:
15 FEB 2026 2:03PM by PIB Mumbai
चालू आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान (जानेवारी 2026 पर्यंत), एकूण 52,537 मेगावॉट वीज निर्मिती क्षमतेची (सर्व स्त्रोतांकडून) विक्रमी भर पडली आहे. यापैकी 39,657 मेगावॉट क्षमतेची भर नवीकरणीय ऊर्जा स्रोतांद्वारे पडली आहे, ज्यामध्ये 34,955 मेगावॉट सौर ऊर्जा, 4,613 मेगावॉट पवन ऊर्जा, 58 मेगावॉट लघु जलविद्युत प्रकल्प आणि 31 मेगावॉट जैवऊर्जेचा समावेश आहे.
एकाच वर्षात झालेली ही आतापर्यंतची सर्वोच्च क्षमता वाढ असून, आर्थिक वर्ष 2024-25 मधील 34,054 मेगावॉट च्या मागील विक्रमाला तिने मागे टाकले आहे.
शिवाय, याचा अर्थ असाही होतो की 2025-26 दरम्यान (31.1.2026 पर्यंत), देशाच्या एकूण स्थापित क्षमतेमध्ये 11% पेक्षा जास्त भर पडली आहे.
31 जानेवारी 2026 पर्यंत, भारताची एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता 520,510.95 मेगावॉट असून त्याचे विभाजन खालीलप्रमाणे आहे:
जीवाश्म इंधन आधारित क्षमता: 248,541.62 मेगावॉट
बिगर-जीवाश्म इंधन क्षमता: 271,969.33 मेगावॉट
अणुऊर्जा : 8,780 मेगावॉट
नवीकरणीय ऊर्जा स्रोत: 263,189.33 मेगावॉट
***
सुषमा काणे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2228370)
अभ्यागत कक्ष : 16