आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव मुंबईत जेजे रुग्णालयातील नूतनीकरण केलेल्या युनानी संशोधन केंद्राचे करणार उद्घाटन आणि युनानी दिन कार्यक्रमाला करणार  संबोधित


आयुष मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 15 फेब्रुवारी रोजी मुंबईत ‘युनानी प्रॅक्टिसमधील नवोन्मेष आणि पुरावे' या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

मुंबईमधील आरआरआययूएमचे नूतनीकरण केलेले को-लोकेशन केंद्र, पुरावा-आधारित संशोधन आणि एकात्मिक आरोग्य सेवेला बळकटी देणार

राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून युनानी औषधांमधील नवोन्मेष आणि जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तज्ञ, संशोधक आणि उपचार तज्ञ एकत्र येणार

Posted On: 13 FEB 2026 4:05PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  प्रतापराव जाधव उद्या जे.जे. हॉस्पिटल कॅम्पसमध्ये मुंबईतील प्रादेशिक युनानी मेडिसिन संशोधन संस्थेच्या (आरआरआययूएम) नूतनीकरण केलेल्या सह-स्थान केंद्राचे उद्घाटन करतील. उद्घाटनानंतर युनानी दिन 2026  चा औपचारिक उत्सव आणि आयुष मंत्रालयाच्या सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन (सीसीआरयूएम) द्वारे आयोजित "युनानी प्रॅक्टिसमधील नवोपक्रम आणि पुरावा" या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन होईल.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्या जे. जे. रुग्णालय परिसरात युनानी औषध प्रादेशिक संशोधन संस्थेच्या (आरआरआययूएम) नूतनीकरण केलेल्या को-लोकेशन केंद्राचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभानंतर युनानी दिन 2026 चा औपचारिक उत्सव साजरा  होईल आणि आयुष मंत्रालयाच्या केंद्रीय युनानी औषध संशोधन परिषदेने (सीसीआरयूएम) आयोजित केलेल्या "युनानी प्रॅक्टिसमध्ये नवोन्मेष आणि पुरावे" या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन होईल.

सुमारे 3.84 कोटी रुपये खर्चून नूतनीकरण केलेले आरआरआययूएम को-लोकेशन केंद्र, युनानी औषध सुविधा मजबूत करण्याच्या आणि आधुनिक औषध प्रणालींच्या सहाय्याने एकात्मिक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. 1984 मध्ये स्थापन झालेले हे केंद्र क्लिनिकल संशोधन, शैक्षणिक प्रशिक्षण आणि रुग्णसेवेसाठी एक प्रमुख सुविधा म्हणून काम करत आहे. त्याच्या सुधारित पायाभूत सुविधांमुळे आता मुंबईतील एका प्रमुख आधुनिक वैद्यकीय कॅम्पसमध्ये पुराव्यावर आधारित संशोधन आणि समृद्ध आरोग्यसेवा प्रदान करणे शक्य होईल.

राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सत्र 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू होईल. बाबासाहेब पाटील, (सहकार मंत्री, महाराष्ट्र शासन), प्रकाश आबिटकर, )सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र शासन), वैद्य राजेश कोटेचा, (सचिव, आयुष मंत्रालय), डॉ. मनीषा उपेंद्र कोथेकर, (अध्यक्ष, राष्ट्रीय भारतीय औषध आयोग),  आयुष मंत्रालयाच्या सहसचिव मोनालिसा दास, डॉ. एम.ए. कासमी, सल्लागार (युनानी), आयुष मंत्रालय; प्रा. सैय्यद शाह आलम, संचालक, राष्ट्रीय युनानी औषध संस्था; आणि डॉ. एन. झहीर अहमद, महासंचालक, सीसीआरयूएम, आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.

नवोन्मेष, संशोधन प्रमाणीकरण आणि एकात्मिक आरोग्य मॉडेल्सवरील चर्चासत्राद्वारे युनानी औषधांमध्ये पुराव्यावर आधारित प्रगतीला चालना देणे, हे या दोन दिवसांच्या परिषदेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये बीज भाषणे, वैज्ञानिक सत्रे, पॅनेल चर्चा आणि युनानी औषध उद्योग, शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्थांच्या योगदानावर प्रकाश टाकणारे प्रदर्शन असेल. यावेळी संस्थात्मक उपक्रमांच्या मालिकेची सुरुवात केली जाईल. यात सीसीआरयूएमचे नवीन सहयोगी वेब पोर्टल आणि मोबाइल ऍप्लिकेशन्सचा शुभारंभ, नवीन प्रकाशने, सामंजस्य करारांची देवाणघेवाण, युनानी औषधांवरील व्हिडिओ आणि संशोधन आणि सराव क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी पुरस्कार वितरण, याचा समावेश आहे

युनानी उपचार पद्धतीचे प्रणेते, शिक्षणतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा युनानी दिन, युनानी औषधांच्या समृद्ध परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली साजरा होत असलेला युनानी दिन 2026, हा औषध पद्धतीच्या पारंपरिक पद्धतींना मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि नवोन्मेष, संशोधन आणि आरोग्य सेवा यांच्या एकत्रीकरणाद्वारे जागतिक पोहोच वाढवण्याचा भारत सरकारचा दृष्टीकोन अधोरेखित करतो.

***

सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227703) अभ्यागत कक्ष : 27