रेल्वे मंत्रालय
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प -3ए अंतर्गत वसई रोड रेल स्थानकावर 42 मीटर लांबीचा नवीन पादचारी सेतू
Posted On:
12 FEB 2026 6:54PM by PIB Mumbai
मुंबई, 12 फेब्रुवारी 2026
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने, मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प -3ए अंतर्गत वसई रोड रेल स्थानकावर सुरू असलेल्या स्थानक सुधारणा कामांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
पूर्वेकडील परिभ्रमण क्षेत्राला फलाट क्रमांक 4-5 आणि 6-7 शी जोडणारा 6 मीटर रुंदीचा आणि 42 मीटर लांबीचा नव्याने बांधलेल्या पादचारी सेतू (एफओबी)चे काम पूर्ण झाले असून, तो आज कार्यान्वित झाला.

याव्यतिरिक्त, नव्याने बांधलेल्या पादचारी पूलाला जोडणारा 50 मीटर लांब आणि 10 मीटर रुंदीच्या उन्नत भागाचेही (नियोजित 250 × 10 मीटर डेकचा भाग) काम झाले असून तो भाग आज वापरण्यास प्रारंभ केला. यापूर्वी, डिसेंबर 2025 मध्ये या उन्नत कार्याचा 600 × 10 मीटरचा भाग कार्यान्वित झाला होता. या सुविधांमुळे भरपूर वर्दळ असलेल्या या स्थानकावर प्रवाशांना ये-जा करणे सुलभ होईल आणि उपनगरीय स्थानकावरील गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे.
वसई रोडवरील स्थानक सुधारणा कामे टप्प्याटप्प्याने केली जात आहेत. कार्यान्वयनातील मर्यादा आणि उपनगरीय रेल्वेची मोठी वाहतूक लक्षात घेऊन या कामांचे नियोजन केले जात आहे. प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे, स्थानकातून दोन्ही दिशांना जाणाऱ्या वाहतुकीत सुधारणा करणे आणि इतर विकासाद्वारे अतिरिक्त प्रतिक्षा तयार करणे हे या कामांचे उद्दिष्ट आहे.

‘एमआरव्हीसी’चे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले :
“वसई रोडवरील नवीन पादचारी पूल आणि एलिव्हेटेड डेकचे कार्यान्वित होणे हे पश्चिम उपनगरीय मार्गिकेवरील प्रवासी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
गर्दीने भरलेल्या उपनगरी विभागात काम करताना अनेक अडचणी असूनही, अखंड रेल्वे सेवा सुरू ठेवत एमआरव्हीसी प्रवासी वाहतूक, सुरक्षितता आणि सोयीसुविधा सुधारण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहे.”
‘एमआरव्हीसी’ उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि एमयूटीपी-3ए प्रकल्पांतर्गत आधुनिक, प्रवासी अनुकूल पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2227219)
अभ्यागत कक्ष : 73