सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आधार वर्ष 2024=100 नुसार ग्राहक किंमत निर्देशांकाबाबत पहिले प्रसिद्धी पत्रक

Posted On: 12 FEB 2026 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 फेब्रुवारी 2026

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आधार वर्ष 2024=100 नुसार ग्राहक किंमत निर्देशांक प्रसिद्ध करत आहे. वस्तूंची यादी आणि संबंधित वजन हे घरगुती वापर खर्च सर्वेक्षण 2023-24 यावर आधारित आहे. चलनफुगवट्याच्या मोजमापाचे प्रतिनिधित्त्व आणि व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला आहे. या सुधारित आवृत्तीमुळे अधिक तपशीलवार माहिती उपलब्ध होते, ज्यामुळे धोरणनिर्माते, वित्तीय संस्था, उद्योग आणि नागरिकांना अचूक आणि माहितीआधारित निर्णय घेणे शक्य होते.

I. प्रमुख आकडेवारी

A. राष्ट्रीय पातळीवरील निर्देशांक

  1. जानेवारी 2026  या महिन्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित वर्ष-दर-वर्ष चलनवाढीचा दर जानेवारी 2025 च्या तुलनेत 2.75% (तात्पुरता) आहे.  ग्रामीण आणि शहरी भागांसाठी संबंधित चलनवाढीचा दर अनुक्रमे 2.73% आणि 2.77% आहे.
  2. खाद्यान्न  चलनवाढ : जानेवारी 2025 च्या तुलनेत जानेवारी 2026 या महिन्यात अखिल भारतीय ग्राहक अन्न किंमत निर्देशांकावर आधारित वर्ष-दर-वर्ष चलनवाढीचा दर  2.13%  (तात्पुरता) आहे. ग्रामीण आणि शहरी भागांसाठी संबंधित चलनवाढीचा दर अनुक्रमे 1.96% आणि 2.44% आहे.
  3. गृहनिर्माण क्षेत्रातील महागाई दर:  जानेवारी 2026 मध्ये वार्षिक आधारावर गृहनिर्माण महागाई दर 2.05%(तात्पुरता) राहिला.  ग्रामीण आणि शहरी भागांसाठी संबंधित चलनवाढीचा दर अनुक्रमे 2.39% आणि 1.92% आहे 
  4. राष्ट्रीय स्तरावर, जानेवारी 2026 महिन्यासाठी संयुक्त क्षेत्रांतील विभागनिहाय महागाईचा दर खालील आलेखात दर्शविला आहे.

  1. जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत संयुक्त क्षेत्रांसाठी 2024 हे आधार वर्ष मानून अखिल भारतीय सामान्य ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आणि अन्न ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीएफआय ) खाली दिले आहेत.

Month

CPI

CFPI

Jan-25

101.67

101.87

Feb-25

101.32

100.40

Mar-25

101.39

100.27

Apr-25

101.58

100.18

May-25

101.90

100.54

Jun-25

102.51

101.74

Jul-25

103.35

103.67

Aug-25

103.74

104.49

Sep-25

103.74

104.12

Oct-25

103.74

103.94

Nov-25

104.01

104.45

Dec-25

104.10

104.09

Jan-26

104.46

104.04

  1. जानेवारी 2026 मध्ये अखिल भारतीय संयुक्त स्तरावर कमी महागाई असलेल्या शीर्ष 5 वस्तूंची माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

S.No.

Item

 

Weight

Inflation (%)

1

Garlic

Image of fresh red and white onions on white background

0.3738

 

-53.05

2

Onion

Image of fresh red and white onions on white background

0.7006

 

-29.27

3

Potato

Image of fresh raw potatoes on white background

0.7549

 

-28.98

4

Arhar, Tur

A Grade Arhar Dal - High Protein, Organic 1Kg, 5% Moisture | Yellow Split  Lentils, Shelf Life: 1 Year at 65.00 INR at Best Price in Lakhimpur | Gyan  Krishna Store

0.5333

 

-24.90

5

Peas

Image of fresh green peas in pod and shelled on white background

0.1254

 

-15.56

  1. जानेवारी 2026 मध्ये अखिल भारतीय संयुक्त स्तरावर जास्त महागाई असलेल्या शीर्ष 5 वस्तूंची माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

S.No.

Item

Weight

Inflation (%)

 

1

Silver Jewellery

Image of elegant silver jewelry sets necklace earrings and bracelets on white background

0.3127

 

159.67

2

Tomato

Image of fresh red tomatoes

0.4961

 

64.80

3

Coconut: copra

0.0854

 

47.18

4

Gold/Diamond/Platinum Jewellery

Watercolor coconut oil illustration isoladed on white background. Healthy food illustration.

0.6230

 

46.77

5

Coconut oil

Watercolor coconut oil illustration isoladed on white background. Healthy food illustration.

0.0579

 

40.44

  1. सीपीआय  2024 मालिकेनुसार जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत सीपीआय आणि सीपीएफआय मधील महिन्यानुसार (MoM) झालेला बदल खालील आलेखात दर्शविला आहे.

 

B. राज्यस्तरीय निर्देशांक

जानेवारी 2026 मध्ये सर्वाधिक महागाई असलेली पाच राज्ये (वर्ष 2011च्या जनगणनेनुसार नुसार 50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली) खाली दिली आहेत:

 

* * *

सुवर्णा बेडेकर/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227166) अभ्यागत कक्ष : 23
Read this releasein: English , हिन्दी