अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

संसदीय प्रश्नोत्तरे: अणुऊर्जा प्रकल्प

Posted On: 11 FEB 2026 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 फेब्रुवारी 2026

 

सध्या, देशात 8,780 मेगावॅट क्षमतेचे एकूण 24 अणुऊर्जा प्रकल्प (आरएपीएस-1 वगळता) व्यावसायिकरित्या कार्यरत आहेत.

अणुऊर्जा अभियानात घोषित केल्याप्रमाणे, 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता गाठण्यासाठी सरकारने एक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार, सध्या अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर असलेल्या प्रकल्पांच्या पूर्णत्वास जाणाऱ्या गतीमुळे 8.78 गिगावॅट च्या सध्याच्या अणुऊर्जा क्षमतेवरून (आरएपीएस -1 वगळता) 2031-32 पर्यंत ती सुमारे 22 गिगावॅट  पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. 2032 नंतर  ‘एनपीसीआयएल’द्वारे आणखी 32 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता स्थापन करण्याची योजना आहे, ज्यामध्ये स्वदेशी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्स (पीएचडब्ल्यूआर) आणि लाईट वॉटर रिॲक्टर्स ( एलडब्ल्यूआर) यांचा समावेश आहे, ज्यामुळे 2047 पर्यंत ही क्षमता सुमारे 54 गिगावॅट  पोहोचेल.या आराखड्यातील, उर्वरित 46 गिगावॅट वीज इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (केंद्र आणि राज्य), राज्य सरकारे, खाजगी क्षेत्र आणि संयुक्त उपक्रमांद्वारे वेगवेगळ्या व्यवसाय प्रारुपांद्वारे  उभारली जाण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये विविध तंत्रज्ञानाच्या अणुभट्ट्या समाविष्ट आहेत.

सध्या तामिळनाडूतील कल्पक्कम येथे भाविनी द्वारे 500 मेगावॅट क्षमतेचा प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर (पीएफबीआर) प्रकल्प सुरू होत आहे. सरकारने तामिळनाडूतील कल्पक्कम येथे  2 x 500 मेगावॅट क्षमतेच्या एफबीआर 1 आणि 2  ‘ट्विन युनिट’साठी प्रकल्पपूर्व उपक्रम राबविण्यास मान्यता दिली आहे. पीएफबीआर कडून पहिला तपासणी अहवाल (क्रिटिकॅलिटी) प्राप्त झाल्यानंतर, एफबीआर 1 आणि 2 प्रकल्पांच्या आर्थिक मंजुरीसाठी सरकारशी संपर्क साधला जाईल.

थोरियमच्या कार्यक्षम वापरासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी अणुऊर्जा विभाग एका लहान आकाराच्या क्षार वितळवणाऱ्या अणुभट्टीचा विकास करत आहे. क्षार वितळवणाऱ्या अणुभट्टीच्या प्रात्यक्षिकासाठी विशेष पदार्थांचा विकास करण्यासाठी रसायनशास्त्रातील संशोधन आणि विकास प्रगतीपथावर आहे. या प्रात्यक्षिक अणुभट्टीच्या यशस्वी ऑपरेशननंतर या अणुभट्टीच्या उच्च शक्तीच्या आवृत्तीचे व्यावसायिक रितीने काम हाती घेतले जाईल.

आंध्र प्रदेशातील वायझॅक येथे एक अणु संशोधन आणि विकास केंद्र स्थापन केले जात आहे.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/संपदा पाटगावकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2226609) अभ्यागत कक्ष : 15