कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

क्षमता विकास आयोगाच्या ‘राष्ट्रव्यापी कर्मयोगी’ जनसेवा कार्यक्रमाचा (टप्पा-2) समारोप


देशभरात 10.5 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

प्रविष्टि तिथि: 10 FEB 2026 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2026

क्षमता विकास आयोगाने नागरी सेवकांसाठी वर्तनात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या ‘राष्ट्रव्यापी  कर्मयोगीजनसेवा कार्यक्रमाची सुरुवात 12 सप्टेंबर 2024 रोजी केली होती. या कार्यक्रमाचा टप्पा-2 आज क्षमता विकास आयोगाचे सदस्य (मनुष्यबळ ) डॉ. आर. बालसुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोप सत्रासह पूर्ण झाला. या परस्परसंवादी वर्तनात्मक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत देशभरात सुमारे 10.5 लाख  (दहा  लाख पन्नास हजार ) शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. समारोप सत्राला विविध मंत्रालये व विभागांतील सुमारे 300 प्रतिनिधी आभासी माध्यमातून सहभागी झाले होते.

डॉ. आर. बालसुब्रमण्यम यांनी या संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झालेल्या सर्व मंत्रालये, विभाग व संस्था (एमडीओ) यांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की या उपक्रमाचा मुख्य उद्देश अंतर्गत उद्दिष्ट आणि बाह्य सेवेतील समन्वय साधणे हा असून, त्यातून सहानुभूतीपूर्ण, कार्यक्षम आणि नागरिककेंद्री सेवा वितरण घडवून आणणे अपेक्षित आहे. या प्रक्रियेत ‘सेवा भाव’ ही प्रमुख प्रेरक शक्ती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बालसुब्रमण्यम यांनी अधोरेखित केले की ही दीर्घकालीन परिवर्तन प्रक्रियेची केवळ सुरुवात असून, ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी प्रतिसादक्षम, सक्षम आणि भविष्याभिमुख प्रशासन संस्कृती निर्माण करण्यासाठी या उपक्रमांचे संस्थात्मक रूपांतरण आवश्यक आहे.

या कार्यक्रमाचा टप्पा-2 एप्रिल 2025 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि त्यामध्ये केंद्र सरकारच्या मंत्रालये व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील संस्थांचा देशभर समावेश करण्यात आला. सुरुवातीला सुमारे 7 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते,मात्र कार्यक्रमाने अपेक्षांपेक्षा अधिक यश मिळवत देशभरात 10 लाखांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. नऊ महिन्यांच्या कालावधीत, केंद्र सरकारच्या 65 हून अधिक मंत्रालये व विभागांतील 500 पेक्षा जास्त संस्थांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला.


सुषमा काणे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2225897) आगंतुक पटल : 69
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी