युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

छत्रपती संभाजीनगर येथील ‘साई’  केंद्रातील खेलो इंडिया बहुउद्देशीय सभागृह महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक सज्जतेत मोलाची भर घालेल :  राज्यमंत्री रक्षा खडसे

Posted On: 08 FEB 2026 8:31PM by PIB Mumbai

 

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय सर्वोत्कृष्टता केंद्राच्या खेलो इंडिया बहुउद्देशीय सभागृहाचा कोनशीला समारंभ केंद्रातील युवा कल्याण आणि  क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झाला. भारतीय क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे त्यावेळी म्हणाल्या.

या कार्यक्रमात आयसीआयसीआय फाउंडेशनने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दिलेल्या उच्च क्षमता क्रीडा विज्ञान साधनांचे उद्घाटन करुन ती क्रीडापटूंना वापरण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली. नव्याने तयार होणाऱ्या बहुउद्देशीय सभागहामुळे खेलो इंडिया अभियानांतर्गत प्रशिक्षण, आरोग्य आणि क्रीडापटूंची क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होतील.

यावेळी बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या की, खेलो इंडिया अभियानामुळे ग्रामीण पातळीवर जागतिक दर्जाच्या सुविधा विकसित होऊन सक्षम क्रीडा क्षेत्र आकाराला येत आहे.

या कार्यक्रमाला आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रीय अधिकारी   अभिजीत पवार, मराठवाडा लघु उद्योग आणि  कषी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या उप संचालक डॉ. मोनिका घुगे यांच्यासह ‘साई’ म्हणजेच क्रीडा प्राधिकारणाचे  अधिकारी आणि अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

खेलो इंडिया अभियानाद्वारे क्रीडा क्षेत्रात जगातील आघाडीचा देश होण्याच्या भारताच्या प्रयत्नांना वेग यावा यासाठी पायाभूत सुविधा विकास, कौशल्य शोध आणि विज्ञानावर आधारित यंत्रणा निर्माण करण्‍यावर  भर दिला जात आहे. 

***

सुवर्णा बेडेकर/ सुरेखा जोशी /परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2225229) अभ्यागत कक्ष : 24