पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

Posted On: 05 FEB 2026 7:33PM by PIB Mumbai

पुणे, 5 फेब्रुवारी 2026

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक कार्यालय, इंडियाटुरिझम, मुंबई द्वारे आणि  कर्नाटक टुरिझम सोसायटीच्या सहकार्याने, पर्यटन भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि आंतरराज्यीय देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी  रोड शोचे आयोजन केले.

या रोड शोचा उद्देश पुणे आणि आसपासच्या प्रदेशातील प्रवासी व्यापारी समुदायाशी संबंध वृद्धिंगत करणे आणि कर्नाटकमधील वैविध्यपूर्ण पर्यटन संधी अधोरेखित करणे हा होता. यामध्ये वारसा आणि संस्कृती, इको-टुरिझम,निरामयता, वन्यजीव आणि साहसी पर्यटन यांचा समावेश होता, ज्यातून एक बहुआयामी पर्यटन स्थळ म्हणून राज्याचे दर्शन घडवण्यात आले.

पुणे रोड शोमध्ये कर्नाटकातील एकूण 34 पर्यटन कंपन्या  सहभागी झाल्या. त्यांनी पुणे क्षेत्रातील ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर आणि इतर प्रमुख पर्यटन हितधारकांना पर्यटन स्थळे आणि अनुभवांची विस्तृत माहिती सादर केली.

पुणे रोड शोला पर्यटन क्षेत्रातील संबंधित  तसेच माध्यम प्रतिनिधींकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. यातून पुण्याच्या पर्यटन क्षेत्रात   पसंतीचे पर्यटन स्थळ म्हणून कर्नाटकप्रति वाढती उत्सुकता आणि मागणी दिसून येते.

या कार्यक्रमात परस्परसंवादी B2B बैठका आणि नेटवर्किंग पार पडली , ज्यामुळे अर्थपूर्ण व्यावसायिक संवाद, नवीन सहलींचा शोध आणि कर्नाटक पर्यटन क्षेत्रातील हितधारक आणि पुण्याच्या पर्यटन क्षेत्रातील सेवा प्रदाते  यांच्यात दीर्घकालीन सहकार्य विकसित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले.


सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2224033) अभ्यागत कक्ष : 41
Read this releasein: English