इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सेमिकॉन इंडिया कार्यक्रमांतर्गत 10 प्रकल्पांना मंजुरी, आयटी क्षेत्राचा महसूल पोहोचला 283 अब्ज डॉलर्सवर
प्रविष्टि तिथि:
04 FEB 2026 7:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2026
सेमीकंडक्टर विकास धोरण पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’, या दृष्टिकोनातून प्रेरित आहे. या धोरणाचा एक भाग म्हणून, भारताने डिझाइन, फॅब्रिकेशन, जोडणी, चाचणी, पॅकेजिंग आणि मॉड्यूल उत्पादन, यासह इतर प्रक्रियांची संपूर्ण परिसंस्था विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
अर्थव्यवस्थेतील सेमीकंडक्टर उद्योगाचे पायाभूत स्वरूप लक्षात घेऊन, सरकारने देशातील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले निर्मिती परिसंस्थेच्या विकासासाठी एकूण 76,000 कोटी रूपये खर्चाचा 'सेमीकॉन इंडिया कार्यक्रम' सुरू केला आहे. या कार्यक्रमाची ठळक कामगिरी पुढीलप्रमाणे :
सरकारने सुमारे 1.6 लाख कोटी रुपयांच्या अपेक्षित गुंतवणुकीसह 10 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये 2 ‘फॅब्स’ आणि 8 पॅकेजिंग युनिट्सचा समावेश आहे. या युनिट्समध्ये सीएमओएस (सिलिकॉन) फॅब, सिलिकॉन कार्बाइड फॅब, प्रगत पॅकेजिंग, मेमरी पॅकेजिंग इत्यादींचा समावेश आहे. हे प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत आणि 4 युनिट्समध्ये प्रायोगिक तत्वावर उत्पादन सुरू झाले आहे.
स्टार्टअप्सद्वारे 24 चिप डिझाइन प्रकल्पांना सहाय्य केले गेले आहे. 16 प्रकल्पांनी टेपआउट्स पूर्ण केले आहेत आणि 13 प्रकल्पांना ‘व्हेंचर कॅपिटल’ मधून निधी मिळाला आहे.
350 विद्यापीठांना ईडीए साधनांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. यांचा उपयोग 65 हजार अभियंते करतात.
मंजूर सेमीकंडक्टर उत्पादन सुविधांची माहिती परिशिष्टात दिली आहे.
अशा सेमीकंडक्टर प्रकल्पांचे मूल्यांकन आणि शिफारशींसाठी नोडल एजन्सी म्हणून सरकारने इंडिया सेमीकंडक्टर मिशन (आयएसएम) ची स्थापना केली आहे. सेमीकंडक्टर तज्ञांव्यतिरिक्त, विविध मंत्रालये/विभागांचे प्रतिनिधी देखील आयएसएमला सल्ला देण्यासाठी नियुक्त आहेत.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या, विशेषत: लहान शहरांमध्ये विकासाला, केंद्र सरकार सक्रिय चालना देत आहे, नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज (नॅसकॉम) ने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार गेल्या 5 वर्षांतील या क्षेत्राची कामगिरी आणि 2024-25 चे अंदाज, खाली नमूद केले आहेत:
(अब्ज डॉलर्समध्ये)
|
|
2020-21
|
2021-22
|
2022-23
|
2023-24
|
2024-25 (E)
|
|
निर्यात
|
152
|
178
|
194
|
214.4
|
224.4
|
|
देशांतर्गत
|
45
|
49
|
51
|
54.4
|
58.2
|
|
एकूण महसूल
|
196
|
227
|
245
|
269
|
283
|
(E) = अंदाज
"संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर" क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक आणि आयटी क्षेत्रातील "सेवा", याबाबतची माहिती उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे (डीपीआयआयटी) त्यांच्या वेबसाइटवर तिमाही आणि वार्षिक आधारावर ऑनलाइन प्रकाशित केली जाते. त्याचप्रमाणे, भारत सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत मंजूर प्रकल्पांच्या गुंतवणूकीचे तपशील पत्र सूचना कार्यालयाद्वारे सार्वजनिकरित्या प्रकाशित केले जातात.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी 04.02.2026 रोजी लोकसभेत ही माहिती सादर केली.
सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2223337)
आगंतुक पटल : 78