कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तेलबियांच्या लागवड क्षेत्रात वाढ, उत्पादनही वाढून 429.89 लाख टनांवर पोहोचले

प्रविष्टि तिथि: 03 FEB 2026 10:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2026

​कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अंतिम अंदाजानुसार, तेलबिया लागवडीखालील क्षेत्रात 2023-24 मधील 301.92 लाख हेक्टरच्या तुलनेत वाढ होऊन 2024-25 मध्ये ते 304.40 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. यासोबतच तेलबियांच्या उत्पादनातही मोठी वाढ झाली असून, 2023-24 मधील 396.69 लाख टनांच्या तुलनेत 2024-25 मध्ये उत्पादन 429.89 लाख टनांपर्यंत पोहोचले आहे.

​देशांतर्गत तेलबिया उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भरतेच्या (आत्मनिर्भर भारत) दिशेने वाटचाल करण्याच्या उद्देशाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी  राष्ट्रीय खाद्यतेल - तेलबिया अभियानाला मंजूरी दिली गेली होती. याअंतर्गत शेतकऱ्यांना वाजवी भाव मिळावा, बाजारातील चढ उतारांपासून त्यांचे संरक्षण व्हावे, आयातीवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि खाद्यतेलाच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी किमान आधारभूत किंमत आणि आयात शुल्काची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (PM-AASHA) या योजनेअंतर्गत केली जाणारी खरेदी तेलबियांसाठी देखील लागू असून, यामुळे शेतकऱ्यांना उत्तम भाव आणि उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे.

कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.


निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2222901) आगंतुक पटल : 55
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी