रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘व्हेईकल-टू-व्हेईकल’ संवादाकरता 30 गिगाहर्ट्झ रेडिओ फ्रिक्वेन्सीचे वितरण केल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती


रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी  बहुआयामी उपाययोजनांवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सल्लागार समितीचा भर

प्रविष्टि तिथि: 23 JAN 2026 5:36PM by PIB Mumbai

 

रस्ते सुरक्षेसंबधी गंभीर समस्यांवरच्या उपाययोजनांसंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीला रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा आणि अजय टम्टा हे देखील उपस्थित होते.

या बैठकीत रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना या विषयावर भर दिला गेला. रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि मौल्यवान जीव वाचवण्यासाठी बहुआयामी तसेच समन्वित दृष्टिकोन अवलंबण्याची गरज या बैठकीत ठळकपणे अधोरेखित केली गेली. यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी रस्ते सुरक्षेत सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मंत्रालयाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती समितीला दिली.

त्यानंतर अतिरिक्त सचिवांनी (वाहतूक) अभियांत्रिकीअंमलबजावणीशिक्षण आणि आपत्कालीन सेवा या रस्ते सुरक्षा विषयक चार मुख्य स्तंभांवर आधारित उपक्रमांचे सविस्तर सादरीकरण केले. या सादरीकरणात आतापर्यंतचे यशविद्यमान आव्हाने आणि नवीन उपाययोजना लागू करण्यासहविद्यमान यंत्रणेला बळकट करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिवांनी कानपूर इथल्या आयआयटी- भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने विकसित केल्या जात असलेल्या कृत्रिम प्रज्ञाधारित रस्ते सुरक्षा तंत्रज्ञानाबाबतही समितीला माहिती दिली.

यावेळी समितीच्या सदस्यांनी मंत्रालयाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.  त्याचवेळी देशभरातील रस्ते अपघात आणि मृत्यूच्या वाढत्या संख्येबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. अभियांत्रिकी सुधारणासार्वजनिक जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणी व्यवस्थेचा अंतर्भाव असलेले सर्वसमावेशक धोरण आखण्याची गरज सदस्यांनी यावेळी व्यक्त केली.

सदस्यांनी अपघातप्रवण ठिकाणांचे (ब्लॅक स्पॉट्स) निराकरणनिवडक राष्ट्रीय महामार्गांच्या पट्ट्यांचे रुंदीकरणमहामार्गालगत ट्रॉमा केअर’  सुविधांची उपलब्धतारस्ते अपघातातील पीडितांसाठी नुकसानभरपाईत वाढरस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती तसेच राज्य महामार्गांसाठी राज्य सरकारांशी समन्वय साधण्याशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. जिल्हा स्तरावर खासदार रस्ते सुरक्षा समितीच्या (एमपीआरएससी) अनियमितपणे होत असलेल्या बैठकारस्त्यांवर योग्य खुणांचा अभाव तसेच फलक आणि रिफ्लेक्टरची निकृष्ट गुणवत्ता याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली. अपघातप्रवण ठिकाणांच्या प्रमाणेच भूस्खलनप्रवण ठिकाणे ओळखली जावीत आणि योग्य सुधारणात्मक उपाययोजना केल्या जाव्यातअशी सूचना करण्यात आली.

या मुद्द्यांवर बोलताना नितीन गडकरी यांनी समितीला माहिती दिली कीदूरसंचार विभागाने वाहन-ते-वाहन संवाद प्रणालीच्या विकासासाठी 30 गिगाहर्ट्झ रेडिओ फ्रिक्वेन्सीचे वाटप केले असून त्यामुळे रस्ते अपघात आणि अपघातातील मृत्यू कमी होण्यास मदत होईल. सदस्यांनी त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारीपोलीससार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर संबंधित संस्थांच्या सहभागाने नियमितपणे एमपीआरएससी बैठका आयोजित करण्याचे महत्त्व राज्यातील अधिकाऱ्यांच्या मनावर बिंबवण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.

बैठकीदरम्यानमंत्र्यांनी रस्ते सुरक्षा गीताचे प्रदर्शनही केले. या गीताचा 22 प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. संसद सदस्यांनी शाळासार्वजनिक सभा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रादेशिक भाषांमध्ये रस्ते सुरक्षा गीत वाजवण्यास प्रोत्साहन द्यावे असे आवाहन गडकरी यांनी केले.

केंद्रीय मंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना देशभरात सुरक्षित रस्ते पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने समर्पित प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी प्रेरित केले तसेच भारतीय रस्त्यांवरील प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

***

सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2217832) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी