संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रजासत्ताक दिन 2026: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आपल्या नवकल्पना कर्तव्य पथावर आणि भारत पर्वमध्ये सादर करणार

प्रविष्टि तिथि: 22 JAN 2026 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जानेवारी 2026

 

संरक्षण संशोधन आणि  विकास संस्था, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या  तंत्रज्ञान नवकल्पना कर्तव्य पथावर  77 व्या प्रजासत्ताक दिन संचलनात आणि  भारत पर्व 2026 मध्ये सादर करणार आहे. यात लांब पल्ल्याची जहाजविरोधी हायपरसोनिक क्षेपणास्त्र आणि 'लढाऊ पाणबुड्यांसाठी नौदल तंत्रज्ञान' या डीआरडीओच्या चित्ररथाचा समावेश आहे.

कर्तव्य पथावर दीर्घ पल्यावरील जहाजविरोधी हायपरसोनिक क्षेपणास्त्र 

संरक्षण संशोधन आणि  विकास संस्था 77 व्या प्रजासत्ताक दिन संचलनात दीर्घ पल्याचे जहाजविरोधी हायपरसोनिक क्षेपणास्त्र  लाँचरसह दर्शवणार आहे. ही शस्त्र प्रणाली भारतीय नौदलाच्या किनारी भागावरच्या सुरक्षा प्रणालीसाठी तयार करण्यात आली आहे. दीर्घ पल्याचे जहाजविरोधी क्षेपणास्त्र,  हे हायपरसोनिक ग्लाइड मिसाइल असून स्थिर आणि गतिशील लक्ष्यांवर प्रभावी आहे तसेच ते विविध पेलोड वाहून नेऊ शकतो. हे क्षेपणास्त्र स्वदेशी एव्हीओनिक्स प्रणाली आणि उच्च अचूकता सेन्सर पॅकेजेससह, अशा प्रकारातले पहिले क्षेपणास्त्र आहे. 

भारत पर्वमध्ये डीआरडीओचा चित्ररथ

या वर्षी 26 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान लाल किल्ल्यावर होणाऱ्या भारत पर्वमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा चित्ररथ सहभागी होणार आहे. या चित्ररथाची संकल्पना ‘लढाऊ पाणबुड्यांसाठी नौदल तंत्रज्ञान’ अशी असून, यात स्वदेशी विकसित तंत्रज्ञान प्रणाली दाखवण्यात येणार आहे, जी भारतीय नौदलाच्या पारंपरिक पाणबुड्यांच्या लढाऊ क्षमतेत लक्षणीय वाढ करणारी आहे.

डीआरडीओने विकसित केलेल्या अनेक प्रणालींचे प्रदर्शन कर्तव्य पथावरील संचलनादरम्यान सशस्त्र दलांच्या तुकड्यांमध्ये  करण्यात येणार आहे. यामध्ये अर्जुन मुख्य युद्ध रणगाडा, नाग क्षेपणास्त्र प्रणाली, ब्रह्मोस क्षेपणास्त्र, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, युद्धभुमी पाळत रडार तसेच रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र यांचा समावेश आहे.

डीआरडीओ ही सशस्त्र दलांसाठी संरेखन आणि विकास संस्था आहे. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला  बळकटी देण्यासाठी ती संरक्षण परिसंस्थेतील सर्व भागधारकांशी- शिक्षण क्षेत्र, उद्योग आणि सेवांसह भागीदारी करून अत्याधुनिक संरक्षण प्रणाली विकसित करते. डीआरडीओद्वारे या प्रणालींचा स्वदेशी विकास हा संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरतेकडे एक मोठे पाऊल असून, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे यश मानले जाते.

 

* * *

सोनाली काकडे/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2217469) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी