दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स कार्यालयाने विकसित केलेले 'संपन्न' पेन्शन पोर्टल,उमंग पोर्टलशी जोडले


'उमंग' आणि 'संपन्न'च्या जोडणी मुळे देशभरातील दूरसंचार विभागाच्या सुमारे 4 लाख निवृत्तीवेतनधारकांना पीपीओ आणि हयातीच्या दाखल्याची वैधता स्थिती तपासणे सुलभ होणार

प्रविष्टि तिथि: 21 JAN 2026 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जानेवारी 2026

कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स कार्यालयाने विकसित केलेली ‘संपन्न’ पेन्शन व्यवस्थापन प्रणाली, ‘उमंग’ (युनिफाइड मोबाइल ऍप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स) प्लॅटफॉर्मशी जोडण्यात आली आहे. या उपक्रमामुळे निवृत्तीवेतनधारकांना उमंग वेब पोर्टल किंवा मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे त्यांचा पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) क्रमांक आणि जीवन प्रमाणपत्र (एलसी) वैधता स्थिती मिळवता येईल, आणि सर्व निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेन्शनशी संबंधित महत्त्वाची माहिती कायम उपलब्ध राहील.

दिल्ली येथील प्रधान संचार लेखा नियंत्रक (पीआर. सीसीए) आशिष जोशी यांनी नमूद केले की, हे एकत्रीकरण निवृत्तीवेतनधारकांना सुलभता देण्यासाठी, पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पेन्शन-संबंधित माहितीचे अखंड वितरण करण्यासाठी केले आहे.

यूएमएएनजी

निवृत्तीवेतनधारकांनी उमंग ऍप्लिकेशनचा वापर गुगल प्ले स्टोअर, ऍपल ॲप स्टोअर, अथवा https://web.umang.gov.in/ वर आधारद्वारे प्रमाणित करून करावा अशी सूचना आहे.


शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2217054) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी