ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांच्या हस्ते ‘एडिकॉन 2026’ परिषदेचे उद्घाटन, आर्थिकदृष्ट्या सक्षम वीज वितरण कंपन्या आणि सुधारित सेवांचे केंद्रीय मंत्र्यांचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 21 JAN 2026 5:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जानेवारी 2026

येणारा काळ ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे, काळ असेल, असे केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी म्हटले आहे. सातत्याने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेला आपल्या कल्पनेपेक्षाही अधिक समृद्ध ऊर्जा क्षेत्राची गरज आहे. अशा परिस्थितीत, आपल्या वीज वितरण कंपन्या (DISCOMs) मजबूत, समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे असे ते म्हणाले. सुधारित सेवा आणि ग्राहकांच्या गरजांविषयी  अधिक संवेदनशीलता हाच मजबूत वीज वितरण कंपन्यांचा अर्थ असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि अखिल भारतीय वीज वितरण संस्था संघटनेच्या (एआयडीए) सहकार्याने 21-22 जानेवारी 2026 दरम्यान इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन इंडस्ट्री कॉन्फरन्स म्हणजेच ‘एडिकॉन 2026’  या वीज वितरण विषयक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनावेळी मनोहर लाल यांनी उस्थितांना मार्गदर्शन  केले.

विद्युत कायद्यातील तरतुदींनुसार गरजू ग्राहकांसाठी लक्ष्यित अनुदानाची सुनिश्चित करतानाच, राज्य वीज नियामक आयोगांनी खर्चावर आधारित दर निश्चित करण्याच्या दिशेने पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात मनोहर लाल याच्या हस्ते अखिल भारतीय वीज वितरण संस्था संघटनेच्या इंडिया डिस्काम्स: 2025 या पहिल्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या अहवालात वीज वितरण क्षेत्राच्या भविष्यातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला आहे.

यावेळी मनोहर लाल यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 9 राज्यांतील 12 वीज वितरण कंपन्यांना सहा विविध श्रेणींअंतर्गत सुवर्ण आणि रौप्य पुरस्कारांनी सन्मानित केले. यामध्‍ये  गुजरात, ओदिशा, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील कंपन्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील महसूल वसुली व्यवस्थेत सुधारणा करण्याशी संबंधित सहा श्रेणींमध्ये हे पुरस्कार देण्यात आले.

या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल, अखिल भारतीय वीज वितरण संस्था संघटनेचे महासंचालक आणि ऊर्जा क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.


सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2216980) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati