पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या भारत भेटीची फलनि:ष्‍पत्ती

प्रविष्टि तिथि: 19 JAN 2026 10:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026

अनु

क्रम

करार/सामंजस्य करार

उद्देश्‍य

1

गुजरात सरकार आणि संयुक्त अरब अमिरातीच्या गुंतवणूक मंत्रालयादरम्यान धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्राच्या विकासासाठी गुंतवणूक सहकार्याबाबत इरादापत्र

गुजरातमधील धोलेरा येथील विशेष गुंतवणूक क्षेत्राच्या विकासात यूएईच्या भागीदारीसाठी गुंतवणूक सहकार्याचा पाठपुरावा करणे. या प्रस्तावित भागीदारीमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, पायलट प्रशिक्षण केंद्र, देखभाल, दुरुस्ती आणि तपासणी (एमआरओ) सुविधा, हरितक्षेत्र बंदर, स्मार्ट शहरी वसाहत, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि ऊर्जा पायाभूत सुविधा यांसारख्या प्रमुख धोरणात्मक पायाभूत सुविधांच्या विकासाचा समावेश असेल.

2

देशाच्या राष्‍ट्रीय अंतराळ प्रोत्साहन आणि अधिकृतता केंद्र (इन-स्पेस) आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अंतराळ संस्थेदरम्यान अंतराळ उद्योग विकास आणि व्यावसायिक सहकार्याला चालना देण्यासाठी संयुक्त उपक्रमासाठी इरादा पत्र.

अंतराळ आणि व्यापारीकरणासाठी संयुक्त पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीने भारत-यूएई भागीदारीला चालना देणे, त्यामध्ये प्रक्षेपण संकुल, उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्र, अंतराळ स्टार्टअप्ससाठी इन्क्यूबेशन सेंटर आणि ॲक्सिलरेटर, प्रशिक्षण संस्था आणि विनिमय कार्यक्रम यांचा समावेश आहे.

3

सामरिक संरक्षण भागीदारीबाबत भारत आणि यूएई यांच्यातील इरादापत्र

सामरिक संरक्षण भागीदारी करार स्थापन करण्यासाठी आणि संरक्षण औद्योगिक सहकार्य, संरक्षण नवोपक्रम आणि प्रगत तंत्रज्ञान, प्रशिक्षण, शिक्षण आणि तत्वप्रणाली, विशेष मोहीम आणि आंतरकार्यक्षमता, सायबर स्पेस, दहशतवादाला विरोध करण्‍यासह इतर विविध क्षेत्रांमध्ये संरक्षण सहकार्य विस्तारण्यासाठी एकत्रितपणे काम केले जाणार.

4

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) आणि अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी गॅस (एडीएओसीगॅस) यांच्यातील विक्री आणि खरेदी करार (एसपीए)

या दीर्घकालीन करारानुसार, 2028 पासून सुरू होणाऱ्या 10 वर्षांच्या कालावधीत एचपीसीएल कंपनी एडीएएनओसी गॅसकडून 0.5 एमएमटीपीए एलएनजी खरेदी करेल.

5

कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, आणि संयुक्त अरब अमिरातीच्या हवामान बदल आणि पर्यावरण मंत्रालयादरम्यान अन्न सुरक्षा आणि तांत्रिक आवश्यकतांवरील सामंजस्य करार.

हा सामंजस्य करार अन्न क्षेत्रातील व्यापार, देवाणघेवाण आणि सहकार्याला चालना देण्यासाठी आहे. तसेच स्वच्छता आणि गुणवत्ता मानकांची तरतूद यामध्‍ये आहे. भारतातून संयुक्त अरब अमिरातीमध्ये तांदूळ, अन्नधान्य उत्पादने आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन दिले जाईल. याचा भारतातील शेतकऱ्यांना फायदा होईल आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अन्नसुरक्षेला हातभार लागेल.

6.

भारतात सुपरकॉम्प्युटिंग क्लस्टरची स्थापना.

 

 

भारतातील सी-डॅक आणि संयुक्त अरब अमिरातीची जी-42 कंपनी भारतात सुपरकॉम्प्युटिंग क्लस्टर स्थापन करण्यासाठी सहकार्य करतील, यावर तत्त्वतः सहमती झाली आहे. हा उपक्रम 'एआय इंडिया मिशन'चा एक भाग असेल आणि एकदा स्थापित झाल्यावर ही सुविधा संशोधन, ॲप्लिकेशन विकास आणि व्यावसायिक वापरासाठी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रासाठी उपलब्ध होईल.

7

2032 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 200 अब्ज डॉलर्सपर्यंत दुप्पट करणार

दोन्ही बाजूंनी 2032 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुपटीने वाढवून 200 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त करण्यासाठी सहमती दर्शवली. दोन्ही बाजूंच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जोडण्यावर आणि भारत मार्ट, व्हर्च्युअल ट्रेड कॉरिडॉर आणि भारत-आफ्रिका सेतू यांसारख्या उपक्रमांद्वारे नवीन बाजारपेठांना चालना देण्यावरही लक्ष केंद्रित केले जाईल.

8

द्विपक्षीय नागरी अणुऊर्जा सहकार्याला चालना देणे

'शांती कायदा 2025' द्वारे निर्माण झालेल्या नवीन संधींचा फायदा घेण्यासाठी, प्रगत अणुतंत्रज्ञानामध्ये भागीदारी विकसित करण्याचे मान्य करण्यात आले. यामध्ये मोठ्या अणुभट्ट्या आणि लहान मॉड्यूलर अणुभट्ट्या (SMRs) यांचा विकास व वापर, तसेच प्रगत अणुभट्टी प्रणाली, अणुऊर्जा प्रकल्पांचे परिचालन आणि देखभाल आणि अणुसुरक्षा या क्षेत्रांमधील सहकार्याचा समावेश आहे.

9

संयुक्त अरब अमिरातीच्या कंपन्या – फर्स्ट अबू धाबी बँक (फॅब) आणि डीपी वर्ल्ड यांच्या कार्यालयांची आणि कामकाजाची गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये स्थापना

फर्स्ट अबू धाबी बँकेची गिफ्ट सिटीमध्ये एक शाखा असेल, जी व्यापार आणि गुंतवणुकीच्या संबंधांना चालना देईल. डीपी वर्ल्ड आपले जागतिक कामकाज, ज्यात जहाजांच्या लीझिंगचा समावेश आहे, गिफ्ट सिटीमधून चालवेल.

10

‘डिजिटल/डेटा दूतावास’ स्थापनेची शक्यता पडताळून पाहणे

परस्परमान्यताप्राप्त सार्वभौमत्व व्यवस्थेअंतर्गत डिजिटल दूतावास स्थापन करण्याच्या शक्यतेचा दोन्ही बाजूंकडून शोध घेण्यावर सहमती झाली आहे.

11

अबु धाबीमध्ये ‘हाऊस ऑफ इंडिया’ची स्थापना

अबु धाबीमध्ये भारतीय कला, वारसा आणि पुरातत्वशास्त्र यांचा समावेश असलेले एक सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर भारत आणि संयुक्त अरब अमिराती सहकार्य करतील, यावर तत्त्वतः सहमती झाली आहे.

12

 

युवा आदानप्रदानांना प्रोत्साहन -- भविष्यातील पिढ्यांमध्ये सखोल सामंजस्य, शैक्षणिक आणि संशोधन सहकार्य तसेच सांस्कृतिक संबंध वाढवण्यासाठी दोन्ही देशांतील युवा प्रतिनिधींच्या गटांच्या भेटींची व्यवस्था करण्याच्या दिशेने काम करण्यास तत्त्वतः सहमती दर्शवण्यात आली आहे.

 

 

 

सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(रिलीज़ आईडी: 2216311) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati