इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डिजिटल इंडिया भाषिणी विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्यामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2026 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने 19 जानेवारी, 26 रोजी ओडिशातील भुवनेश्वर येथे आयोजित 'चिंतन शिबिर – आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबी पीएम-जेएवाय) आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) यांचा राष्ट्रीय आढावा' यामध्ये सहभाग घेतला.
या चर्चेमध्ये एआय म्हणजे कृत्रिम प्रज्ञेवर आधारित नवोपक्रम आणि सर्वसमावेशक भाषिक सुलभतेद्वारे डिजिटल आरोग्याला चालना देण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाशी सुसंगत विचार मांडण्यात आले. डिजिटल आरोग्य व्यासपीठ भाषिक आणि भौगोलिक सीमा ओलांडून वापरण्यायोग्य, सुलभ आणि प्रभावी असतील याची खात्री करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि डिजिटल इंडिया भाषिणी विभाग यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळे ‘एबी पीम-जेएवाय’ आणि ‘एबीडीएम’ सह प्राधिकरणाच्या डिजिटल आरोग्य मंचावर बहुभाषिक भाषांतर सेवा आणि एआय-शक्तीवर आधारित भाषिक सहाय्य सक्षम करता येईल.
या भागीदारीद्वारे, डिजिटल इंडिया भाषिणी विभाग राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाला लाभार्थी-केंद्रित आणि प्रशासकीय मंचावर बहुभाषिक आणि ध्वनी-सक्षम उपाययोजना लागू करण्यासाठी मदत करणार आहे. यामध्ये जबाबदार डेटा प्रशासन, सुरक्षित प्रणाली एकत्रीकरण आणि वास्तविक जगातील वापर आणि अभिप्रायाद्वारे भाषा मॉडेल्समध्ये सतत सुधारणा करण्याची तरतूद असेल.
हा सामंजस्य करार सरकारच्या भारतीय भाषांमध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा समेकित करण्याच्या आणि आरोग्य क्षेत्रात नागरिक-केंद्रित,कृत्रिम प्रज्ञा-सक्षम प्रशासनाला चालना देण्याच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2216256)
आगंतुक पटल : 12